सासष्टी तालुक्यात अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्याच्या वाढत्या घटना

सासष्टी तालुक्यात अल्पवयीन मुलींचे विशेषत: शाळकरी मुलींचे अपहरण करण्याच्या वाढत्या घटना घडत आहेत. या ८ प्रकरणांमधील ६ घटनांचा पोलिसांनी छडा लावला आहे, तर उर्वरित २ प्रकरणांचे अन्वेषण चालू आहे. अन्वेषण चालू असलेली प्रकरणे चालू मासातच नोंद झाली आहेत.

मूलभूत सुविधांचा फार्स !

जे प्राथमिक आहे, तेच होत नाही, तर आंतरिक प्रेरणेने जनतेला काय आवश्यक आहे, ते जाणून घेऊन करणे किती दूर आहे ! ते होण्यासाठी प्रखर राष्ट्रनिष्ठा, जनतेप्रती प्रेम आणि पालकत्वाची भावना हवी ! तसे झाल्यास न्यायालयाला अशा गोष्टींत लक्ष घालावे लागणार नाही !

गोवा अन्नधान्यात स्वावलंबी बनेल ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

आत्मनिर्भर भारतासमवेत स्वयंपूर्ण गोवा सिद्ध करणे हे शेतकर्‍यांच्या हाती आहे. भाजपचे केंद्रातील आणि राज्यातील शासन शेतकर्‍यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. कृषी व्यवस्थेतील दलाली भाजपने बंद केली आहे. शेतकर्‍यांच्या प्रयत्नांमुळे अन्नधान्यात गोवा स्वावलंबी बनेल, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला.

अमली पदार्थांची वाहतूक रोखण्यासाठी इन्सुली तपासणी नाक्यावर विशेष पथक तैनात

मुंबई-गोवा महामार्गावर तालुक्यातील इन्सुली येथील तपासणी नाक्यावर ख्रिस्ती नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी अमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली आहे.

जनतेकडून कर घेणारे; पण जनतेसाठी काही न करणारे लज्जास्पद भारत सरकार !

‘कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या दळणवळण बंदीमुळे सौदी अरेबियात रहात असलेल्या ४५० भारतीय कामगारांच्या नोकर्‍या गेल्यामुळे त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ आली. यामुळे या कामगारांना ‘डिटेंशन सेंटर’मध्ये (स्थानबद्धता केंद्रात) ठेवण्यात आले.

उज्जैनमधील मुसलमानबहुल भागात हिंदूंनी आयोजित केलेल्या फेरीवर धर्मांधांकडून दगडफेक !

गेली कित्येक शतके हिंदूंवर धर्मांधांकडून अत्याचार होत आहेत. याचे कारण हिंदूंच्या वृत्तीत पालट झाला नाही. हिंदूंनी साधना करून आध्यात्मिक बळ वाढवले असते, तर हिंदूंवर अशी वेळ आली नसती !

पंजाबमध्ये संघाच्या स्वयंसेवकाची हत्या करणार्‍या खलिस्तानवाद्यांना ब्रिटनमध्ये अटक आणि जामिनावर सुटका

भारतात कुणीही येऊन भारतीय नागरिकाची हत्या करून पुन्हा पसार होतो, हे भारताला लज्जास्पद !

महाराष्ट्र सरकार सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांवर सूड उगवत आहे ! – आमदार नितेश राणे, भाजप

राज्यशासनाने ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ कार्यक्रमाच्या अंतर्गत राज्यात ४७ सहस्र कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याचे सांगितले आहे; मात्र त्यांपैकी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत एकाही रुपयाची गुंतवणूक नाही…..

इतर देशांच्या तुलनेत प्रत्येक बातमीत भारत मागासलेला असल्याचे आणखी एक उदाहरण !

‘नायजेरियातील कदुना प्रांताच्या सरकारने बलात्कार्‍यांना शस्त्रकर्म करून नपुंसक बनवण्याचा कायदा संमत केला आहे, तसेच १४ वर्षांखालील मुलीवर बलात्कार करणार्‍याला फाशीची शिक्षा देण्याची तरतूदही या कायद्यात करण्यात आली आहे.

खालची रेवंडी येथे धूपप्रतिबंधक बंधारा तोडणार्‍यांवर कारवाई करा ! – रेवंडी ग्रामपंचायतीची मागणी

मालवण पतन विभागाने बांधलेला धूपप्रतिबंधक बंधारा तोडून, तसेच त्या ठिकाणच्या कांदळवन वृक्षाची बेसुमार तोड करणार्‍यांच्या विरोधात योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी रेवंडी ग्रामपंचायतीच्या वतीने मालवणचे तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्या निवेदनाद्वारे केली आहे.