‘कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या दळणवळण बंदीमुळे सौदी अरेबियात रहात असलेल्या ४५० भारतीय कामगारांच्या नोकर्या गेल्यामुळे त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ आली. यामुळे या कामगारांना ‘डिटेंशन सेंटर’मध्ये (स्थानबद्धता केंद्रात) ठेवण्यात आले. यातील बहुतांश कामगारांच्या काम करण्याच्या परवान्याची मुदत संपली आहे. नोकरी नसणे आणि परवान्याची मुदत संपणे, या कारणांमुळे भारतीय कामगारांवर भीक मागण्याची वेळ आली.’