ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याच्या निर्णयाला सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध

‘ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करा आणि बक्षीस मिळवा’ राष्ट्रवादीच्या आमदारांचा या योजनेचा उद्देश चांगला असला, तरी हेतू मात्र राजकीय आहे. विरोधक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे हा वाद आणखी चिघळणार आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत कडकनाथ कोंबड्या उधळण्यास निघालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची यात्रा पोलिसांनी रोखली 

कडकनाथ संघर्ष यात्रा रोखतांना स्वाभिमानीचे पदाधिकारी-कार्यकर्ते आणि पोलीस यांची झटापट झाली.

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नेतृत्वाविषयी शिवसेनेने सल्ला देऊ नये ! – अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री

संयुक्त पुरोगामी आघाडीचे नेतृत्व सोनिया गांधी यांनी करावे, हे एकमताने मान्य केलेले आहे.

चारकोप (मुंबई) येथील मंदिराला लागलेल्या भीषण आगीत २ जणांचा होरपळून मृत्यू

कांदिवलीतील साईबाबा मंदिरात ‘शॉर्ट सर्किट’मुळे लागलेल्या आगीमध्ये २ जणांचा होरपळून मृत्यू झाला.

२५ वर्षांपूर्वी नगरसेविका म्हणून लक्षणीय काम केलेल्या प्राचार्या वैद्या रूपा शहा यांना ‘संत गाडगे महाराज समाजभूषण’ पुरस्कार प्रदान 

नगरसेवकांचे संपर्क कार्यालय असणे, हा पायंडा शहा यांनी पाडला आहे.

अकलूज (जिल्हा सोलापूर) येथे पार पडली युवासेनेची आढावा बैठक 

युवासेना कोअर कमिटीत ‘गाव तिथे शाखा; बूथ तिथे युथ’ ही संकल्पना सांगितली.

राज्यातील कारागृहातील अपप्रकार रोखण्यासाठी ‘ड्रोन’ यंत्रणा कार्यान्वित केली जाणार ! – सुनील रामानंद, अप्पर पोलीस महासंचालक (कारागृह)

गुन्हेगारांना सुधारण्यासाठी असणार्‍या यंत्रणेवरच लक्ष ठेवण्यासाठी जर ‘ड्रोन’चा वापर करावा लागणार असेल, तर यंत्रणेसाठी यापेक्षा दुर्दैव ते काय ?

अनधिकृतपणे वृक्षतोड करून जिल्हा परिषदेच्या भूमीवर पिकाची लागवड

अनधिकृतपणे वृक्षतोड करून तेथे पीक घेणार्‍या भाजप जिल्हाध्यक्षाच्या भावावर आणि एकावर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला.

मराठा आरक्षणात राज्य सरकारकडून घोडचुका झाल्या आहेत ! – विनायक मेटे, आमदार

सरकारच्या भूमिकेमुळे मराठा समाजाच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे आणि हे सरकार हा संभ्रम वाढवण्याचे काम जाणीवपूर्वक करत आहे.

कळंबा कारागृहाच्या अधीक्षकांचे स्थानांतर

कळंबा कारागृहात अज्ञातांनी पाऊण किलो गांजा, १० भ्रमणभाष, २ ‘पेन ड्राईव्ह’, ४ ‘चार्जर कॉड’ आणि चिकटवण्यासाठी वापरण्यात येणारे मिश्रण फेकले होते.