वाढवण बंदराच्या विरोधात १५ डिसेंबरला किनारपट्टीवर बंद

आशिया खंडातील सर्वांत मोठे बंदर म्हणून वाढवण बंदर मुंबई येथे विकसित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. हे बंदर झाल्यास मच्छिमारांसह १० लाख नागरिकांवर उपासमारीची वेळ येईल, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठीची रणनीती राज्य सरकारने ठरवावी ! – विनायक मेटे, अध्यक्ष, शिवसंग्राम सेना

२५ जानेवारी २०२१ पासून मराठा आरक्षणाच्या प्रकरणाची नियमित सुनावणी चालू होत असल्याने मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठीची रणनीती राज्य सरकारने ठरवावी, असे मत शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी सरकारी विश्रामगृहावर माध्यमांशी बोलतांना व्यक्त केले.

छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीचे राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या हस्ते १५ डिसेंबरला लोकार्पण होणार

संगम माहुली येथील राजघाटावरील छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांच्या समाधीचा जीर्णोद्धार लोकसहभागातून करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांचा बंगला थकबाकीदार सूचीत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य अनेक मंत्र्यांचे बंगले मुंबई महापालिकेने थकबाकीदार सूचीत टाकले आहेत. लाखो रुपयांची पाणीपट्टी थकवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे

हाँगकाँग येथील मोठ्या प्रसारमाध्यम आस्थापनाचे मालक जिमी लाई यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक

चीनकडून लोकशाहीचे समर्थन करणार्‍यांची मुस्कटदाबी चालूच !

न्यूयॉर्कमध्ये चर्चबाहेरील गर्दीवर अंदाधुंद गोळीबार : जीवितहानी नाही !

येथील मॅनहटन भागातील एका चर्चबाहेर आयोजित कार्यक्रमासाठी जमलेल्या लोकांच्या दिशेने अंदाधूंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात कुणीही घायाळ झाले नाही.

सत्ताधारी भाजपचे उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतींवर निर्विवाद बहुमत

सत्ताधारी भाजपने उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतींवर निर्विवाद बहुमत प्रस्थापित केले आहे. उत्तर गोवा जिल्हा पंचायतीवर भाजपचे १९, काँग्रेसचा १, तर अपक्ष ५ उमेदवार विजयी झाले, तर दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीवर भाजपचे १४, काँग्रेसचे ३, मगोपचे ३, ‘आप’चा १, राष्ट्रवादी काँग्रेसचा १ आणि अपक्ष २ उमेदवार विजयी झाले आहेत.

पुढील ४ ते ६ मासांमध्ये कोरोनाची परिस्थिती चिंताजनक होणार ! – बिल गेट्स यांची चेतावणी

इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मॅट्रिक्स अँड एवेल्यूएशनच्या अंदाजानुसार या कालावधीमध्ये कोरोनामुळे २ लाखांहून अधिक जणांचा मृत्यू होऊ शकतो. मास्क लावण्यासारख्या इतर नियमांचे पालन केल्यास मृत्यूचा हा आकडा अल्प होऊ शकतो.

बांगलादेशमध्ये मंदिरातील श्री महाकालीमातेच्या ३ मूर्तींची तोडफोड आणि दागिन्यांची लूट !

पाबना (बांगलादेश)च्या शुजानगरमधील अहमदपूरमध्ये असणार्‍या काली मंदिरातील श्री महाकालीमातेच्या ३ मूर्ती अज्ञातांकडून तोडण्यात आल्या आणि दागिने लुटल्याची घटना समोर आली आहे.