न्यूयॉर्कमध्ये चर्चबाहेरील गर्दीवर अंदाधुंद गोळीबार : जीवितहानी नाही !

न्यूयॉर्क (अमेरिका) – येथील मॅनहटन भागातील एका चर्चबाहेर आयोजित कार्यक्रमासाठी जमलेल्या लोकांच्या दिशेने अंदाधूंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात कुणीही घायाळ झाले नाही. पोलिसांनी त्वरित या व्यक्तीवर गोळीबार करून त्याला घायाळ केले. त्याला उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.