केंद्राने कायदे करावेत !

धर्मांतरविरोधी कायदा हा लव्ह जिहादच्या आघातांसाठी पुरेसा नसल्याचे आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी सांगितल्याप्रमाणे त्यासाठी वेगळ्या कायद्याची आवश्यकता आहे. जर धर्मांतरविरोधी कायदा झाला, तर केंद्राला तोही करणे सोपे जाईल. त्यामुळे हिंदुहिताचे निर्णय घेऊन केंद्र सरकारने हिंदूंना आश्वस्त करावे !  

इस्रायली साम्यवादी !

अद्यापही भारताचा सत्य इतिहास मांडणार्‍या चित्रपटाला होणारा विरोध, हा त्या सत्याची शक्ती एकप्रकारे दाखवतो. असो. साम्यवादी आणि जगभरातील चित्रपटसृष्टी यांचे नाते पुन्हा एकदा या निमित्ताने उघड झाले. हिंदूंनी मात्र त्यांचे शत्रू ओळखून सदैव सावध रहायला हवे, हेच यातून शिकता येईल !

आंध्रप्रदेशची ख्रिस्तीकरणाकडे वाटचाल !

एकूणच रेड्डी सरकारचे अस्तित्व हे देश आणि हिंदु धर्म यांसाठी मोठा धोका आहे. हे आतातरी लक्षात घेऊन समस्त हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे, अन्यथा आज पोलिसांच्या पावतीवर असणारे येशूचे चित्र उद्या आंध्रप्रदेशची ‘अधिकृत मुद्रा’ व्हायला वेळ लागणार नाही !

नैतिकतेचे अधःपतन !

शिक्षिकेला त्रास देणार्‍या या मुलांना शिक्षा होईल का ? या मुलांना मोकाट सोडले, तर शिक्षिकेला त्रास देणारी ही मुले समाजातील मुली आणि महिला यांच्याशी कशा प्रकारे वागतील, याचाही विचार व्हायला हवा. नीतीवान पिढी घडवण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र पालट हवा, हे मात्र नक्की !

पेशवाई पुन्हा यावी !

पुरोगामित्व, सुधारणावाद, निधर्मीवाद ‘हे ‘वाद’ समाजाला समृद्धीकडे नव्हे, तर विनाशाकडे नेणारे आहेत’, हे जनतेने आता जाणले आहे. त्यामुळे प्रा. नरके करत असलेल्या दिशाहीन टीकेला जनता भीक घालणार नाही. भविष्यात जनतेने अशांचा वैचारिक प्रतिवाद करून त्यांना वठणीवर आणल्यास आश्चर्य वाटणार नाही !

अमेरिकेची लुडबुड !

अमेरिकेतील अर्थकारण हे भारतीय बुद्धीमंतांच्या अस्तित्वावर आहे, हे अमेरिकेने लक्षात घ्यावे. त्यामुळे अमेरिकेने भारताच्या धार्मिक स्वातंत्र्याविषयी अहवाल सादर करण्याऐवजी त्याने तेथे अस्तित्वात असलेला वर्णवाद मिटवण्याकडे लक्ष द्यावे.

इतिहासाचे पुनर्लेखन हवेच !

साम्यवादी इतिहासकारांनी त्यांच्या पूर्वग्रहदूषित आणि हिंदुद्वेषी मानसिकतेच्या चष्म्यातून भारतीय इतिहासाकडे पाहिल्याने त्यांना येथील पराक्रमी राजे दिसलेच नाहीत किंवा त्यांना मोगल ‘प्यारे’ वाटले. आता शासनांनी दैदीप्यमान अन् गौरवशाली इतिहास भारतियांना अवगत करावा, ही अपेक्षा !

निराशावादी नको, ध्येयवादी व्हा !

निसर्ग आनंद देतोच; पण केवळ निसर्ग हेच आनंद मिळवण्याचे एकमेव माध्यम आहे, असे नाही. ईश्वराची आराधना करणे, तसेच धर्माचरण करणे यांतूनही आनंद मिळू शकतो. यासाठी साधनेची कास धरा. चिकाटी, संयम, परिश्रम, आत्मविश्वास आणि ईश्वरनिष्ठा ही यशाची पंचसूत्री जोपासून आयुष्यात यशस्वी व्हा !

फुटबॉलचे धर्मकारण !

भारताचे शत्रू असलेल्या, तसेच भारताची वारंवार कुरापत काढणार्‍या देशाविरुद्ध आम्ही खेळणार नाही’, अशी बाणेदार भूमिका भारतीय खेळाडूंनी घेतल्यास जनतेच्या दृष्टीने ते खर्‍या अर्थाने विजेते ठरतील आणि मग त्यांना वेगळा चषक मिळवण्याची आवश्यकताच उरणार नाही !

हिजाबविरोधी खेळाडू !

इराणी फुटबॉलपटूंकडून भारतीय क्रिकेटपटूंनी बोध घ्यावा ! ‘विविध देशांमध्ये खेळतांना देशाचे प्रतिनिधित्व करणे’ एवढ्यापुरते मर्यादित न रहाता एक जागरूक नागरिक म्हणून स्वतःची भूमिका बजावणे आवश्यक आहे. भारतीय क्रिकेटपटूंच्या हे लक्षात येईल, तो सुदिन !