अफझलखानाचा कोथळा पुन्हा काढला !

शासनाच्या या कौतुकास्पद कृतीसाठी हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी यांना दीर्घकाळ वाट पहावी लागली. असे असले, तरी त्यांना शासनाने चांगली बातमी दिलीच ! हिंदुत्वनिष्ठ शासनाचेही अभिनंदन ! आता हिंदुत्वनिष्ठांची गड-दुर्ग अतिक्रमणमुक्त होण्यासाठीची प्रतीक्षा शासनाने संपवावी, ही जनतेची अपेक्षा !

चीनची उघड दादागिरी !

चीनच्या या वाढत्या दादागिरीला मोदी सरकारने आता ‘जशास तसे’ उत्तर दिले पाहिजे. चीनला धडा शिकवण्याचा नामी उपाय म्हणजे चीनशी सर्व व्यापारी संबंध तोडून टाकणे ! नाक दाबल्यावरच तोंड उघडत असेल, तर त्याला आपण तरी काय करणार ?

‘हलाल’ला झटका !

देशात जेथे जेथे अशा परिषदा होतील, तेथे वैध मार्गांनी विरोध केला पाहिजे. हा कार्यक्रम रहित झाला, म्हणजे सगळे संपले असे नाही, जोपर्यंत भारतात हलालचे प्रमाणीकरण करणारी व्यवस्था निरस्त होत नाही, तोपर्यंत हा लढा चालूच राहिला पाहिजे. आवश्यकता आहे ती आपण सर्वांनी कृतीशील होण्याची !

आर्थिक आरक्षणाचा शिक्का !

आर्थिक आरक्षण वैध ठरवतांना न्यायमूर्तीनी ‘कोणतेही आरक्षण अमर्यादित काळासाठी असू नये. त्याचा आढावा घेतला जावा, जे पुढारलेले आहेत, त्यांना वगळण्यात यावे, स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाल्याने आरक्षणाचा पुन्हा नव्याने विचार केला पाहिजे’, अशा सूचना केल्यात. याचा विचार शासनकर्त्यांकडून केला जाईल, अशी अपेक्षा करूया !

खलिस्तान्यांना ठेचा !

पंजाबच्या अमृतसर शहरामध्ये शिवसेनेचे नेते सुधीर सूरी यांची खलिस्तानवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. यानंतर देशात हिंदू आणि त्यांच्या संघटना यांच्याकडून विशेष विरोध, संताप किंवा निषेध होतांना दिसत नाही.

नेपाळला हवे हिंदु राष्ट्र !

नेपाळहून अधिक हिंदू भारतात आहेत. ‘भारतालाच हिंदु राष्ट्र घोषित केल्यास नेपाळसह अन्य अनेक देश स्वतःला हिंदु राष्ट्र घोषित करतील’, असे पुरीचे शंकराचार्य यांनी म्हटले आहे. शासनकर्त्यांनी ते मनावर घ्यावे, ही हिंदूंची अपेक्षा !

स्फोटांचा कोईम्बतूर पॅटर्न !

या प्रसंगातून तमिळनाडूला हिंदु किंवा राष्ट्र यांच्या हिताच्या विरोधातील नवीन प्रयोगशाळा बनवण्याचा प्रयत्न होत असल्याची शंका प्रबळ होण्यास वाव आहे. कोईम्बतूर येथील आक्रमणाचे अन्वेषण करतांना अन्वेषण यंत्रणेने आतंकवाद्यांनी निर्माण केलेली सर्व यंत्रणा मोडून काढणे अपेक्षित आहे !

कुंकवाच्या आडून !

जी मंडळी भारतीय संस्कृतीवर टीका करत आहेत, त्यातील अनेक जण वैयक्तिक आयुष्यात कसे वागतात ? नीतीमत्तेचे किती पालन करतात ? याचा त्यांनी अंतर्मुख होऊन विचार करावा आणि त्या तुलनेत पू. भिडेगुरुजी यांचे स्थान काय आहे ? याचे आत्मचिंतन करावे. मग योग्य आणि अयोग्य हे सांगण्यासाठी कुणाचीच आवश्यकता भासणार नाही.

इस्रायलमध्ये बेंजामिन नेतान्याहूच !

‘मेक इन इंडिया’तही इस्रायलची तंत्रज्ञानातील गुंतवणूक चांगल्या प्रकारे असून नेतान्याहू परत एकदा पंतप्रधान झाल्याने भारतात उत्पादित होणार्‍या सर्वच स्वदेशी उपकरणांच्या निर्मिती क्षेत्रात गती मिळेल. भारताने आतंकवादाच्या विरोधात आणखी खुलेपणाने इस्रायलचे साहाय्य घेऊन ‘आतंकवादमुक्त भारत’ करावा, हीच अपेक्षा !

स्वतंत्र भारतातील सैनिकांचे पारतंत्र्य !

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते, ‘‘भारत पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट आणि बाल्टिस्तान या भागांपर्यंत पोचल्यानंतरच काश्मीरच्या संपूर्ण विकासाचे उद्दिष्ट पूर्ण होईल.