सांगली जिल्ह्यात २३ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

विविध आंदोलने आणि आगामी सण-उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगली जिल्ह्यात ९ ते २३ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश घोषित केला आहे.

भारतरत्नांची चौकशी करणार्‍या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?  – फडणवीस

शेतकर्‍यांच्या आंदोलनावर विदेशातील वलयांकित व्यक्तींनी ट्वीट केल्यानंतर त्याला उत्तर देण्यासाठी भारतीय वलयांकित व्यक्तींनी केलेल्या ट्वीटची चौकशी करणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घोषित केले आहे.

मुंबई विमानतळाच्या २३.५ टक्के भागाची अदानी यांच्याकडून खरेदी

‘अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड’ या आस्थापनाने परदेशातील आस्थापन ‘एसीएस्ए ग्लोबल लिमिटेड’ आणि ‘बिड सर्व्हिसेस डिव्हिजन (मॉरिशस) लिमिटेड’ यांच्याकडून हे भाग १६८५ कोटी २५ लाख रुपये इतके मूल्य देऊन खरेदी केले आहेत.

संगम माहुली येथे उसाच्या शेताला लागलेल्या आगीत ८ एकरातील ऊस जळला

या आगीत ८ एकरातील ऊस जळून गेला. त्यामुळे ६ शेतकर्‍यांची लक्षावधी रुपयांची हानी झाली. नदीकाठी असलेल्या कचर्‍याला आग लावण्यात आली होती.

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे भाजपच्या नेत्याला काळे फासणार्‍या २५ शिवसैनिकांवर गुन्हा नोंद

वीजदेयक वसुलीविरुद्ध आंदोलनात भाजप नेते शिरीष कटेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी कटेकर यांच्या तोंडाला काळे फासले होते.

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर कार्निव्हलचे आयोजन करण्यास नेते आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा विरोध

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर कार्निव्हलचे आयोजन करू नये आणि हा निर्णय धोकादायक ठरू शकतो. हा कार्निव्हल पर्यटकांसाठी आयोजित केला जातो.

११ फेब्रुवारीपासून दादर-म्हैसुरू साप्ताहिक एक्सप्रेस चालू

दादर-म्हैसुरू साप्ताहिक एक्सप्रेस ११ फेब्रुवारीपासून दादर येथून, तर १४ फेब्रुवारीपासून म्हैसुरू येथून चालू होणार आहे, असे मध्य रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले आहे. रेल्वे मंत्रालयाकडून उत्तर आणि दक्षिण भारतात टप्प्याटप्प्याने रेल्वे वाहतूक चालू करण्यात येत आहे.

फुटीर १२ आमदारांच्या अपात्रता याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने मार्चपर्यंत पुढे ढकलली

भाजपात प्रवेश केलेले काँग्रेसचे १० आणि मगोपचे २ आमदार यांच्या विरोधात प्रविष्ट करण्यात आलेल्या अपात्रता याचिकांवर गोवा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर २६ फेब्रुवारी या दिवशी सुनावणी घेणार आहेत.

काजूला योग्य मूल्य न मिळाल्यास शेतकरीच काजू खरेदी करणारा शोधणार !

योग्य भाव न मिळाल्यास शेतकरी चांगले मूल्य देणारा खरेदीदार (काजू खरेदी करणारा व्यापारी) शोधून त्याला काजू विक्री करतील.

मालवण पंचायत समिती राबवणार ‘ऐतिहासिक स्थळांवर स्वच्छता मोहीम’ हा अभिनव उपक्रम

ऐतिहासिक स्थळांवर स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय घेणार्‍या मालवण पंचायत समितीचे अभिनंदन !