‘ऑनलाईन’ सत्संगांच्या वर्षपूर्तीनिमित्त भावपूर्ण वातावरणात साजरा झाला ‘कृतज्ञता सोहळा’ !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा संयुक्त उपक्रम !

मुंबई – गतवर्षी दळणवळण बंदीनंतर सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे प्रत्यक्ष समाजात जाऊन धर्मप्रसार करण्याचे कार्य थांबले. त्यानंतर काही दिवसांमध्ये ‘ऑनलाईन’ माध्यमाद्वारे हे धर्मकार्य पुनश्‍च चालू करण्यात आले. या ‘ऑनलाईन’ धर्मप्रसारामध्ये नामजप सत्संग, भावसत्संग, धर्मसंवाद आणि बालसंस्कारवर्ग या उपक्रमांचा समावेश आहे. या उपक्रमांना जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हिंदी, कन्नड, मल्ल्याळम् आणि तमिळ या भाषांमधून हे सत्संग चालू आहेत. या माध्यमातून लाखो जिज्ञासूंपर्यंत धर्मशास्त्र पोचले. सहस्रो जिज्ञासूंनी त्यानुसार आचरण करून अनुभूती घेतल्या. ३ एप्रिल या दिवशी या मालिकांची वर्षपूर्ती झाली. त्यानिमित्ताने ३ एप्रिल या दिवशी ‘ऑनलाईन’ ‘कृतज्ञता सोहळा’ आयोजित करण्यात आला.

(याविषयीचे सविस्तर वृत्त लवकरच प्रसिद्ध करत आहोत.)