गेल्या ३० वर्षांत स्पेनमध्ये मुसलमानांच्या लोकसंख्येत १० पट वाढ !

बहुसंख्य ख्रिस्ती असणारा युरोप भविष्यात मुसलमानबहुल झाल्यास आश्‍चर्य वाटू नये !

पाश्‍चिमात्य देश अजूनही रशियाकडून तेल आणि वायू विकत घेत आहेत ! – रशियाचा दावा

मार्च २०२३ मध्ये ‘ब्लूमबर्ग’ संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार काही युरोपीय देश रशियाचा नैसर्गिक द्रवरूप वायू (लिक्विफाईड नॅच्युरल गॅस) नियमितपणे विकत घेत आहेत. यामध्ये स्पेन आघाडीवर आहे.

रशियाकडून युक्रेनवर आतापर्यंतचे सर्वांत मोठे ड्रोन आक्रमण ! – युक्रेनचा दावा

युक्रेनने आरोप केला की, इराणने रशियाला ड्रोन दिले असून रशिया युक्रेनच्या विरोधात त्यांचा वापर करते. इराणने मात्र हा आरोप फेटाळला आहे. दुसरीकडे रशियानेही ‘आम्ही वापरत असलेली सर्व शस्त्रास्त्रे रशियामध्येच बनवली जातात’, असे म्हटले आहे. 

ब्रिटनचे पंतप्रधान सुनक यांच्या सरकारी घराच्या फाटकाला चारचाकी वाहनाची धडक !

पोलिसांनी वेळीच धाव घेत आरोपी चालकाला अटक केली. आरोपीने हे कृत्य जाणीवपूर्वक केले आहे का ?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेत कुणी घायाळ झालेले नाही.

टिपू सुलतानच्या तलवारीचा लंडनमध्ये १४३ कोटी रुपयांना लिलाव !

लिलावगृहाच्या संकेतस्थळानुसार, टिपूच्या पराभवानंतर तलवार त्याच्या शयनकक्षात मिळाली होती. मोगल शस्त्र निर्मात्यांनी ही तलवार जर्मन ब्लेड पाहून बनवली होती.

जगाने पुढील महामारीसाठी सिद्ध रहावे, जी कोरोनापेक्षाही धोकादायक असू शकते ! – जागतिक आरोग्य संघटना

कोरोना ही आता जागतिक आणीबाणी नसली, तरी याचा अर्थ असा नाही की, आता यापासून कोणताही धोका नाही. जगाने पुढील महामारीसाठी सिद्ध रहावे, जी कोरोनापेक्षाही धोकादायक असू शकते.

बर्मिंगहम (ब्रिटन) येथील चित्रपटगृहात मुसलमान तरुणाने केला ‘द केरल स्टोरी’चा विरोध

जगाच्या पाठीवर कुठेही धर्मांधांचे खरे स्वरूप कोणत्याही माध्यमांतून उघड झाले, तर त्याला मुसलमानांमधील कट्टरतावादी समूह विरोध करतो आणि या समाजातील तथाकथित सुधारणावादी मुसलमान त्याविषयी अक्षरही बोलत नाहीत !

नेदरलँड्समध्ये ‘द केरल स्टोरी’च्या प्रदर्शनास आरंभ !

कुठे नेदरलँड्समधील जनतेने चित्रपटाच्या माध्यमातून ‘जिहाद’ विरोधात सतर्क व्हावे, असे वाटणारे खासदार गीर्ट विल्डर्स, तर कुठे जिहादी आतंकवादाने होरपळून निघालेल्या बंगाल राज्यात चित्रपटावर बंदी लादणार्‍या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी !

भारतीय संस्कृतीचे जागतिकीकरण होत आहे ! – परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

भारतीय संस्कृतीचे जागतिकीकरण होत आहे. भारतीय संस्कृतीचा प्रचार करण्यासाठी नवीन मार्ग शोधले जात आहेत.  आंतरराष्ट्रीय योग दिन हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या अधिकार्‍याचे काश्मीरसंदर्भातील आरोप खोटे ! – भारताची स्पष्टोक्ती

काश्मीरमध्ये होणार्‍या जी-२० बैठकीसंदर्भात संयुक्त राष्ट्रांच्या एका अधिकार्‍याने केलेले आरोप भारताने फेटाळून लावले आहेत. संयुक्त राष्ट्रांचे अल्पसंख्यांक व्यवहार प्रतिनिधी फर्नांड डी व्हर्नेस यांनी जम्मू-काश्मीर आणि तेथील अल्पसंख्यांकांच्या प्रश्‍नांवर एक निवेदन प्रसारित केले होते.