टिपू सुलतानच्या तलवारीचा लंडनमध्ये १४३ कोटी रुपयांना लिलाव !

क्रूरकर्मा टिपू सुलतान

लंडन (इंग्लंड) – १८ व्या शतकात बनवलेली क्रूरकर्मा टिपू सुलतानची तलवार लंडनमध्ये लिलावात १४३ कोटी रुपयांना विकली गेली आहे. ‘बोनहॅम्स’ या लिलावगृहाने दिलेल्या माहितीनुसार मिळालेली रक्कम अपेक्षेपेक्षा सात पटींहून अधिक असल्याचे लिलाव जिंकणार्‍याचे म्हणणे आहे. ही तलवार आतापर्यंत विकली जाणारी सर्वांत महागडी भारतीय आणि इस्लामी वस्तू बनली आहे.

लिलावगृहाच्या संकेतस्थळानुसार, टिपूच्या पराभवानंतर तलवार त्याच्या शयनकक्षात मिळाली होती. मोगल शस्त्र निर्मात्यांनी ही तलवार जर्मन ब्लेड पाहून बनवली होती. ४ मे १७९९ या दिवशी टिपू सुलतानच्या पराभवानंतर श्रीरंगपट्टण येथून त्याची बरीच शस्त्रे लुटली गेली. त्यांच्यात या तलवारीचाही समावेश होता.