पाश्‍चिमात्य देश अजूनही रशियाकडून तेल आणि वायू विकत घेत आहेत ! – रशियाचा दावा

फ्रान्स, स्पेन, बल्गेरिया आणि बेल्जियम यांसारख्या देशांचा समावेश !

पाश्‍चिमात्य देशांनी रशियावर निर्बंध घातलेले असूनही अजूनही पाश्‍चिमात्य देश वेगवेळ्या मार्गांनी रशियाकडून तेल आणि गॅस खरेदी करत आहेत 

मॉस्को (रशिया) – अमेरिका आणि युरोपियन युनियन यांनी रशियन तेल अन् ऊर्जा उत्पादनांवर कठोर निर्बंध लादले असले, तरी अनेक पाश्‍चिमात्य देश अजूनही वेगवेळ्या मार्गांनी रशियाकडून तेल खरेदी करत आहेत, असा दावा रशियाचे ऊर्जामंत्री निकोले शुल्गिनोव्ह यांनी केला. शुल्गिनोव्ह यांनी युरोपीय देश कोणत्या मार्गांनी रशियन तेल आयात करत आहेत ?, याविषयी मात्र माहिती दिली नाही.

रशियाचे ऊर्जामंत्री निकोले शुल्गिनोव्ह

१. मार्च २०२३ मध्ये ‘ब्लूमबर्ग’ संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार काही युरोपीय देश रशियाचा नैसर्गिक द्रवरूप वायू (लिक्विफाईड नॅच्युरल गॅस) नियमितपणे विकत घेत आहेत. यामध्ये स्पेन आघाडीवर आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध चालू झाल्यावर स्पेनच्या रशियातून होत असलेल्या आयातीमध्ये ८४ टक्क्यांची वाढ झाली आहे. वर्ष २०२३ च्या पहिल्या अडीच मासांत रशियाच्या जीवाश्म इंधनाची आयात करण्यातही स्पेन हा आघाडीवर होता.

२. फ्रान्सने वर्ष २०२२ मध्ये रशियाकडून सर्वाधिक, म्हणजे १.९ दशलक्ष टन नैसर्गिक द्रवरूप वायू आयात केला आहे. यानंतर फ्रान्स आणि बेल्जियम यांचा क्रमांक लागतो.