बर्मिंगहम (ब्रिटन) येथील चित्रपटगृहात मुसलमान तरुणाने केला ‘द केरल स्टोरी’चा विरोध

बर्मिंगहम येथील चित्रपटगृहामध्ये शकील अफसरने ‘द केरल स्टोरी’ चित्रपट चालू असतांना त्याला विरोध करत गोंधळ घातला

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनमधील बर्मिंगहम शहरातील मल्टीप्लेक्स चित्रपटगृहामध्ये एका मुसलमान तरुणाने ‘द केरल स्टोरी’ चित्रपट चालू असतांना त्याला विरोध करत गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. या तरुणाचे नाव शकील अफसर आहे.

१. या व्हिडीओमध्ये शकील ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाला भाजप आणि रा.स्व. संघ यांचा प्रचार असल्याचे म्हणतांना दिसत आहे. तसेच तो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याविषयी अभद्र शब्द बोलतांना दिसत आहे. ‘हा चित्रपट खोटा आहे. आम्ही हे सहन करणार नाही. हा चित्रपट आपल्यात फूट पाडण्यासाठी काढण्यात आला आहे’, असे तो म्हणत आहे.

२. शकील याच्याकडून गोंधळ घातला जात असतांना प्रेक्षकांनी प्रथम दुर्लक्ष केले; मात्र ‘हा एक इस्लामद्वेषी चित्रपट आहे. तुम्हाला हा चित्रपट पहातांना लाज कशी वाटत नाही ?’ असे तो म्हणू लागल्यानंतर प्रेक्षकांनी त्या विरोध करायला चालू केले.

३. यानंतर या तरुणाला चित्रपटगृहाच्या बाहेर नेण्यात आले. तेव्हा तो ‘स्वतंत्र काश्मीर’ अशा घोषणा देऊ लागला. बाहेर पडतांना त्याच्यासमवेत अजूनही काही तरुण होते जे ‘द केरल स्टोरी’च्या प्रदर्शनाच्या वेळी असाच गोंधळ घालणार होते, असे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

संपादकीय भूमिका

  • जगाच्या पाठीवर कुठेही धर्मांधांचे खरे स्वरूप कोणत्याही माध्यमांतून उघड झाले, तर त्याला मुसलमानांमधील कट्टरतावादी समूह विरोध करतो आणि या समाजातील तथाकथित सुधारणावादी मुसलमान त्याविषयी अक्षरही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • भारतासह ब्रिटनमध्येही लव्ह जिहादचे प्रकार वाढत आहेत. असे असतांना तेथील सरकार अशा घटनांकडे गांभीर्याने पाहून संबंधितांवर कारवाई करतील, तो सुदिन !