पुतिन यांच्या पालकांचा अवमान केल्याच्या प्रकरणी रशियातील महिलेला २ वर्षांचा कारावास !

येथील न्यायालयाने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या आई-वडिलांचा अवमान केल्याच्या प्रकरणी एका महिलेला २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

युद्ध, हिंसाचार आणि नैसर्गिक आपत्ती यांमुळे वर्ष २०२२ मध्ये जगभरात ७ कोटी लोक विस्थापित ! – ‘अंतर्गत विस्थापन निरीक्षण केंद्र

युद्ध, हिंसाचार आणि नैसर्गिक आपत्ती यांमुळे वर्ष २०२२ मध्ये ७ कोटी १० लाख लोक जगभरात विस्थापित झाल्याची माहिती ‘अंतर्गत विस्थापन निरीक्षण केंद्रा’च्या जागतिक अहवालात देण्यात आली आहे.

सरकारला माझा शिरच्छेद करायचा होता ! – पोप फ्रान्सिस यांचा अर्जेंटिना सरकारवर गंभीर आरोप

फ्रान्सिस यांनी हे आरोप २९ एप्रिल या दिवशी हंगेरी दौर्‍यावर असतांना जेसुइट्समध्ये बोलतांना केले आहे. जेसुईट्स हा रोमन कॅथॉलिक चर्चच्या व्रस्तस्थांचा एक संघ आहे. 

 कॅनडा आणि चीन या देशांकडून एकमेकांच्या राजदूतांची हकालपट्टी !

चीनकडून भारतात सातत्याने अशा प्रकारची कुरघोडी करण्यात येते. ती पहाता भारताने चिनी राजदूतांची केवळ हकालपट्टी करणे नव्हे, तर चीनशी सर्व प्रकारचे संबंध तोडणे देशहिताचे आहे ! भारत कॅनडाकडून बोध घेणार का ?

पुतिन यांच्या निवासस्थानावर युक्रेनचे आक्रमण ! – रशियाचा आरोप

युक्रेनच्या ड्रोननी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या ‘क्रेमलिन’ येथील निवासस्थानावर आक्रमण केल्याचा आरोप रशियाने केला आहे, अशी माहिती ‘रॉयटर्स’ वृत्तसंस्थेने दिली आहे.

कालीमातेचा अनादर केल्यावरून युक्रेनने भारताची मागितली क्षमा !

भारताला नेहमीच पाण्यात पहाणार्‍या युक्रेनचे खरे स्वरूप ओळखा ! सध्या रशियामुळे संकटात सापडलेल्या युक्रेनचे हे नाटक आहे, हे लक्षात घ्या !

पृथ्वीवरील कोणातीही जागा प्रदूषणापासून मुक्त नाही ! – संशोधन

सध्या वापरात असलेली ३ लाख ५० सहस्रांहून अधिक रसायने पर्यावरणाला प्रदूषित !

रशियाने युक्रेनी शहरांवर केलेल्या हवाई आक्रमणांत १३ लोक ठार !

युक्रेनी सैन्याला पाश्‍चिमात्य मित्रराष्ट्रांकडून नवे युद्ध साहित्य मिळाल्यानंतर ‘आम्ही रशियावर आक्रमण करणार’, असा सुतोवाच वोलोदिमिर झेलेंस्की यांनी केला होता. त्यानंतर रशियाने ही आक्रमणे केली.

बिशपच्या बैठकीत महिलांना मिळणार मतदान करण्याचा अधिकार ! – पोप फ्रान्सिस यांचा निर्णय

खिस्त्यांच्या २ सहस्र वर्षांच्या इतिहासतील पहिली घटना !