रशियाकडून युक्रेनवर आतापर्यंतचे सर्वांत मोठे ड्रोन आक्रमण ! – युक्रेनचा दावा

आतापर्यंतचा रशियाचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला

कीव (युक्रेन) – रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचे सर्वांत मोठे ड्रोन आक्रमण केल्याचा आरोप युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी केला. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने मात्र अद्याप यास दुजोरा दिलेला नाही.

झेलेंस्की म्हणाले की, युक्रेनवर एका वेळीच ५४ रशियन ड्रोन्सचा मारा करण्यात आला. बहुतेक ड्रोन युक्रेनी सैन्याने पाडले; परंतु मध्य युक्रेनमधील झायतोमिर परिसरात काही ड्रोन पडल्याने हानी झाली आहे. ५४ पैकी ३६ ड्रोन हे एकट्या राजधानी कीववर डागण्यात आले असून त्यामध्ये एक व्यक्ती ठार झाली, तर २ जण घायाळ झाले आहेत.

 (सौजन्य : TV9 Bharatvarsh)

यासह युक्रेनने आरोप केला की, इराणने रशियाला ड्रोन दिले असून रशिया युक्रेनच्या विरोधात त्यांचा वापर करते. इराणने मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे. दुसरीकडे रशियानेही ‘आम्ही वापरत असलेली सर्व शस्त्रास्त्रे रशियामध्येच बनवली जातात’, असे स्पष्ट केले आहे.