देशात २ सहस्र मशिदी, तर ५३ इस्लामी संघटना !
माद्रीद (स्पेन) – गेल्या ३० वर्षांत युरोपीय देश असणार्या स्पेनमधील मुसलमानांची लोकसंख्या १० पटींनी वाढली आहे. ही माहिती स्पेनच्या ‘सेक्रेटरी ऑफ द इस्लामिक कमिशन’ने एका अहवालामध्ये दिली आहे. स्पेनमधील मुसलमानांची लोकसंख्या २५ लाखांच्या पुढे गेली असल्याचे सांगितले जात असले, तरी ही संख्या ३० लाखांहून अधिक असल्याचे या आयोगाचे महंमद अजाना यांनी सांगितले.
प्रवासी बनकर आए मुस्लिम और बदल दी स्पेन की डेमोग्राफी: 30 साल में 10 गुना बढ़े, ग्रैंड मस्जिद में हर जुमे हो रहा धर्मांतरण; इबादतगाह 2000 के पार#Spain #Muslims #Demographyhttps://t.co/VN2kZvbVJW
— ऑपइंडिया (@OpIndia_in) May 31, 2023
१. महंमद अजाना म्हणाले की, पूर्वी येथील मुसलमानांच्या लोकसंख्येत अनिवासी अधिक होते; मात्र आता मुसलमान नागरिक म्हणून त्यांची संख्या अधिक झाली आहे. १० लाखांहून अधिक मुसलमान स्पेनचे नागरिक आहेत. अन्य मुसलमानांमध्ये अनिवासी आहेत. त्यात मोरक्को, पाकिस्तान, बांगलादेश, अलज्जीरिया, सेनेगल या देशांतून आलेले मुसलमान आहेत. बहुतेक मुसलमान स्पेनच्या औद्यागिक शहरांमध्ये रहातात.
२. सध्या स्पेनमध्ये ५३ मुसलमान संघटना आहेत, तर २ सहस्रांहून अधिक मशिदी आहेत. तसेच ४० कब्रस्ताने आहेत. ‘मशीद बांधण्यासाठी सरकारकडून परवाना घ्यावा लागतो. तो घेतांना अडचणी येतात’, असे महंमद अजाना यांनी सांगितले.
३. स्पेनमधील आंदालुसिया शहरात प्रत्येक शुक्रवारी अनेक जण इस्लाम स्वीकारतात. या प्रक्रियेला येथे ‘शहादा’ म्हटले जाते. येथील ग्रँड मशिदीमध्ये हे धर्मांतर केले जाते. या मशिदीत एका पाद्य्रानेही इस्लाम स्वीकारला होता.
४. ‘स्पेनिश इस्लामिक सोसायटी असोसिएशन’ आणि ‘ग्रानाडा ग्रँड मॉस्क फाऊंडेशन’चे अध्यक्ष उमर देल पोजो यांनी सांगितले की, कोरोना महामारीच्या काळात धर्मांतरात वाढ झाली होती. ग्रानाडामध्ये ३६ सहस्र मुसलमान असून त्यांतील ३ सहस्र ७०० जण धर्मांतरित मुसलमान आहेत. धर्मांतराची छायाचित्रे आणि व्हिडिओ प्रसारित होत असतात.
संपादकीय भूमिकाबहुसंख्य ख्रिस्ती असणारा युरोप भविष्यात मुसलमानबहुल झाल्यास आश्चर्य वाटू नये ! |