जिनेव्हा (स्वित्झर्लंड) – कोरोना ही आता जागतिक आणीबाणी नसली, तरी याचा अर्थ असा नाही की, आता यापासून कोणताही धोका नाही. जगाने पुढील महामारीसाठी सिद्ध रहावे, जी कोरोनापेक्षाही धोकादायक असू शकते, अशी चेतावणी जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रेयसस यांनी केली आहे. ते संघटनेच्या ७६ व्या जागतिक आरोग्य संमेलनाच्या बैठकीत त्यांचा अहवाल सादर करतांना बोलत होते. ‘अशा परिस्थितीत आतापासून सिद्धता करावी लागेल’, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
टेड्रोस बैठकीत म्हणाले की, कोरोनामुळे सुमारे ७० लाख लोकांचा मृत्यू झाला, तर वास्तविक आकडा २ कोटींहून अधिक असू शकतो. हे पहाता आपल्या आरोग्य क्षेत्रात लवकरात लवकर आवश्यक पालट करणे आवश्यक आहे.