प्रदूषणाकडे दुर्लक्ष करणार्‍या अकोला आणि अमरावती महानगरपालिकांवर कारवाई कधी ? – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

प्रदूषण रोखण्यासाठी कोणतीही कारवाई न करणार्‍या अकोला आणि अमरावती या महानगरपालिकांविरुद्ध प्रदूषण नियंत्रण मंडळ कधी कारवाई करणार ?, असा प्रश्‍न हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे विचारला.

कोरोनाचे संकट असतांना नवरात्रोत्सवाचे मंडप घालू दिलेच कसे ? – उच्च न्यायालय

महापालिकेने कोरोनाच्या काळात अशा आयोजनाची अनुमती कशी दिली ?,-न्यायमूर्ती शाहरूख काथावाला

परभणी जिल्ह्यात ‘बर्ड फ्ल्यू’चा शिरकाव झाल्याने ८० सहस्र कोंबड्या मारण्यात येणार ! – सुनील केदार, पशूसंवर्धन मंत्री

शहरात ८०० कोंबड्यांचा ‘बर्ड फ्ल्यू’मुळे मृत्यू झाला आहे. यानंतर जिह्यातील ८० सहस्र कोंबड्या मारण्यात येणार आहे. राज्यातील ६ जिल्ह्यांना याचा धोका असणार आहे – राज्याचे पशूसंवर्धन मंत्री सुनील केदार

सामूहिक बलात्काराची खोटी तक्रार देणार्‍या महिलेवर खटला प्रविष्ट करण्याचा न्यायालयाचा आदेश

वाई (जिल्हा सातारा) येथे सामूहिक बलात्काराची खोटी तक्रार नोंंदवणे महिलेच्या अंगलट आले आहे. या महिलेच्या विरोधात न्यायालयाने खटला प्रविष्ट करण्याचे पोलिसांना आदेश दिले आहेत.

अग्नीशमन यंत्रणा खरेदीचा प्रस्ताव कार्यालयातून पुढे गेला नसल्याचे उघड

भंडारा येथील रुग्णालयात ‘इनक्युबेटर’जवळ नर्स असणे बंधनकारक असतांना ही घटना घडली तेव्हा नर्स या कक्षात नसल्याची माहिती पुढे येत आहे.

तीन वर्षे हिंदुत्वनिष्ठांनी विरोध केल्यानंतर सातारा नगरपालिका पुन्हा या वर्षी ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती सेवा पुरस्कार’ वितरणासाठी प्रयत्नशील

ज्यांच्या संस्थेवर भ्रष्टाचाराचे आरोप होतात आणि ज्यांच्या संस्थेचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे आरोप होतात, त्यांच्या नावाने नगरपालिकेला पुरस्कार का द्यावासा वाटतो ?

अभिनेता सोनू सूद यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यांना अनधिकृत बांधकाम प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने सोनू सूद यांच्या इमारतीवरील कोणत्याही कारवाईवर १३ जानेवारीपर्यंत बंदी घातली आहे.

गुन्ह्यातील संशयित आरोपींच्या समवेत बैठक घेणारा पोलीस हवालदार निलंबित

जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील एस्.बी.आय.च्या प्रवेशद्वारावर ५ ऑक्टोबर या दिवशी व्यावसायिक राजेश कानाबार यांची आर्थिक वादातून हत्या झाली होती.

लेखक भालचंद्र नेमाडे यांच्यावर भोसरीत अदखलपात्र गुन्हा नोंद

भालचंद्र नेमाडे यांच्या वर्ष २०१० मध्ये प्रकाशित झालेल्या ‘हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ’ या पुस्तकात लमाण समाजातील स्त्रियांविषयी दिलेली माहिती ही भावना दुखावणारी असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

वाळू चोरी प्रकरणातील ६ जण पंढरपूर तालुक्यातून हद्दपार

अनेक गुन्हे नोंद केल्यानंतरही वाळू चोरी करणार्‍या ६ जणांना पंढरपूर तालुक्यातून हद्दपार करण्याची कारवाई पोलिसांनी केली आहे. उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी हे आदेश काढले आहेत.