
सातारा – वाई (जिल्हा सातारा) येथे सामूहिक बलात्काराची खोटी तक्रार नोंंदवणे महिलेच्या अंगलट आले आहे. या महिलेच्या विरोधात न्यायालयाने खटला प्रविष्ट करण्याचे पोलिसांना आदेश दिले आहेत. जिल्ह्यात असे खोटे गुन्हे नोंंदवण्याच्या प्रकारात वाढ होत आहे.
२७ जुलै २०१९ या दिवशी वाई पोलीस ठाण्यात एका महिलेने ‘दोघांवर नोकरीला लावतो’, असे आमीष दाखवत वाई ते महाबळेश्वरच्या रस्त्यावर वारंवार गाडीमध्ये सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार नोंंदवली होती. त्यानुसार वाई पोलिसांनी तपास केल्यावर पोलिसांना या दोघांपैकी एक आरोपी गुन्हा घडल्याच्या दिवशी परदेशात होता, तर दुसरा आरोपी पुण्यात होता, असे लक्षात आले. ज्या चारचाकी मध्ये सामूहिक बलात्कार केल्याचा गुन्हा घडला, असे सांगण्यात आले होते. ती चारचाकी गुन्हा घडण्याच्या पूर्वी नांदेडमध्ये होती, अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली.
महिलेने दिलेली तक्रार आणि तपासात समोर आलेल्या सर्व गोष्टी यांमध्ये तफावत असल्याने पोलिसांनी या प्रकरणात ‘ब’ नावाने माहिती (समरी) वाई न्यायालयात प्रविष्ट केली. त्यानुसार महिलेने दिलेली तक्रार चुकीची आणि द्वेषापोटी केली असल्याचे न्यायालयात सिद्ध झाल्याने वाई न्यायालयाने बलात्काराची खोटी तक्रार प्रविष्ट करणार्या महिलेविरुद्ध खटला नोंदवण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. पोलीस या महिलेच्या विरोधात खोटी तक्रार दिल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंदवणार आहेत.
कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !