मध्यप्रदेशात ३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणार्‍याला फाशीची शिक्षा

मध्यप्रदेशातील न्यायालय अवघ्या ५ मासांत अशा प्रकारचा निर्णय देऊ शकते, तर अन्य राज्यांमध्ये बलात्काराच्या खटल्यांना निकाली काढण्यास वेळ का लागतो ?

पाकिस्तानला मूर्ख आणि अशिक्षित आतंकवादी मिळतच रहाणार ! – केंद्रीय राज्यमंत्री व्हि.के. सिंह

पाकिस्तान वर्ष १९९० पासून भारताच्या विरोधात जिहादी आतंकवाद्यांना एकत्र करत आहे. हे काम तो चालूच ठेवणार आहे. थोड्याशा पैशांसाठी सिद्ध होणारे मूर्ख आणि अशिक्षित आतंकवादी पाकला मिळतच रहाणार.

देहलीत प्रदूषण असल्यामुळे सोनिया गांधी आणि राहुल गांधी गोवा भेटीवर

देहली येथे प्रदूषण असल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचा पुत्र राहुल गांधी गोव्यात आले आहेत. एका खासगी जेट विमानाने २० नोव्हेंबरला दुपारी ते गोव्यात आले.

‘लेबर गेट’ घोटाळ्याचे भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या माध्यमातून अन्वेषण करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता

‘इमारत आणि इतर बांधकाम मजूर कल्याण निधी’मध्ये गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणी (‘लेबर गेट’ घोटाळा) भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या माध्यमातून अन्वेषण करण्यास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मान्यता दिली आहे.

श्रीराम सेनेचे प्रमुख तथा प्रखर हिंदुत्वनिष्ठ प्रमोद मुतालिक यांच्या गोवा प्रवेशबंदीत वाढ

श्रीराम सेनेचे प्रमुख तथा प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रमोद मुतालिक यांच्या गोवा प्रवेशबंदीत २ मासांनी वाढ करण्यात आली आहे. दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांनी दक्षिण गोव्याच्या पोलीस अधीक्षकांच्या अहवालाच्या आधारे १० नोव्हेंबरपासून प्रवेशबंदीत वाढ केली आहे.

काश्मीरमध्ये मारले गेलेले आतंकवादी २६/११ सारखे आक्रमण करण्याच्या सिद्धतेत होते !

आज १२ वर्षांनंतरही आतंकवादी पुन्हा असेच आक्रमण करण्याची सिद्धता करतात, हे पहाता भारताने गेल्या १२ वर्षांत देशातील जिहादी आतंकवाद नष्ट केलेला नाही, त्यासाठी त्याचा निर्माता असलेल्या पाकला नष्ट करण्याचे धाडस भारताने आता दाखवायला हवे !

(म्हणे) ‘डोळे फोडून आंधळे केले जाईल !’

अशी धमकी देणार्‍या चीनचे दात जगाने घशात घातले पाहिजेत, असेच कुणालाही वाटेल !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात समुद्रकिनार्‍यावरील जलक्रीडा प्रकार चालू करण्यास अनुमती ! – जिल्हाधिकारी

‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत पर्यटन क्षेत्र, तीर्थस्थळे, प्रार्थनास्थळे चालू करण्यास अनुमती देण्यात आली आहे, तसेच उपाहारगृहे, रेस्टॉरंट यांसह खासगी वाहतुकीसही अनुमती देण्यात आली आहे.

गोव्यात आजपासून १० वी आणि १२ वीच्या वर्गांना प्रारंभ

राज्यातील १० आणि १२ वी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी नियमित वर्गांना २१ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. बहुतेक विद्यालयांनी विद्यार्थ्यांना गटागटांमध्ये विद्यालयात येण्याची सूचना केली आहे

कॅसिनो धक्क्याजवळ बेशिस्तपणे उभ्या केलेल्या वाहनांच्या विरोधात पणजी महानगरपालिकेची कारवाई चालूच

पणजी महानगरपालिकेने कारवाई करतांना ‘पार्किंग निषिद्ध’ असलेल्या विभागात उभी केलेली अनेक दुचाकी वाहने कह्यात घेतली आहेत, तसेच चारचाकी वाहनांना ‘क्लॅम्प’ लावण्यात आले आहेत.