गाय चोरल्याच्या संशयावरून झालेल्या मारहाणीत दोघांचा मृत्यू

धुपगुरी गावाजवळ हफीझुल शेख आणि अन्वर हुसेन या दोघांनी गाय चोरल्याच्या संशयावरून जमावाने त्यांना मारहाण केली. यात या दोघांचा मृत्यू झाला.

बीरभूम (बंगाल) येथे झालेल्या स्फोटात तृणमूल काँग्रेसच्या मुसलमान नेत्याचे घर उद्ध्वस्त

बीरभूम जिल्ह्यातील बाराबन गावात तृणमूल काँग्रेसचे नेते शेख आयनस यांच्या घरात झालेल्या स्फोटात त्यांचे घर उद्ध्वस्त झाले.

(म्हणे) मुसलमानांच्या वैयक्तिक कायद्यात हस्तक्षेप करण्याचा न्यायालयाला अधिकार नाही ! – बंगालचे मंत्री सिद्दीकुल्लाह चौधरी

सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकार यांना मुसलमानांच्या वैयक्तिक कायद्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी टीका बंगालमधील मंत्री सिद्दीकुल्लाह चौधरी यांनी केली.

बंगालमध्ये शिकवणी शिक्षक शेख इम्रान याने केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे १८ वर्षीय हिंदु मुलीची आत्महत्या

बंगालच्या मालदा जिल्ह्यातील धर्मुतोला क्षेत्रामध्ये बारावीच्या वर्गात शिकणार्‍या १८ वर्षीय हिंदु मुलीने नुकतीच आत्महत्या केली. या आत्महत्येला शिकवणी शिक्षक शेख इम्रान उत्तरदायी आहे, असा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे.

बंगालमध्ये ममता (बानो) सरकारकडून या वर्षीही मोहरमच्या दिवशी दुर्गामूर्ती विसर्जनावर बंदी

बंगालमधील ममता(बानो) बॅनर्जी यांच्या सरकारकडून याही वर्षी मोहरममुळे दुर्गामूर्ती विसर्जनासाठी एक दिवसाची बंदी घालण्यात आली आहे. ३० सप्टेंबरला सायंकाळी ६ वाजल्यापासून १ ऑक्टोबरपर्यंत दुर्गामूर्ती विसर्जनावर ही बंदी असणार आहे.

बंगालमध्ये एक कोटी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी भाजप नेत्याला अटक

एक कोटी रुपयांची फसवूणक केल्याच्या प्रकरणी कोलकाता पोलिसांनी भाजप नेते अनुपम दत्ता यांना डमडम विमानतळावर अटक केली.

दंगलीला कथित निमित्त ठरलेल्या अल्पवयीन हिंदु मुलाला कारागृहातून बालसुधारगृहात पाठवले

काही दिवसांपूर्वी बंगालममध्ये उत्तर २४ परगना जिल्ह्यातील बशीरहाट गावात धर्मांधांनी हिंदूंवर भीषण आक्रमण करून सलग ३ दिवस त्यांची घरे आणि दुकाने यांची अपरिमित हानी केली.

आज धर्म-अधर्मच्या दृष्टीने ध्रुवीकरणाची आवश्यकता ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

महाभारतात युद्धाच्या वेळी अर्जुनाच्या समोर त्याचे नातेवाइक होते. त्यांच्याबरोबर युद्ध करणार नाही, असे त्याने सांगितले. तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला गीताज्ञान देऊन शास्त्र सांगितले.

श्रीमद् श्रीउपेन्द्रमोहनजी यांचा १४५ वा जन्मोत्सव चैतन्यमय वातावरणात साजरा

शास्त्र धर्म प्रचार सभेकडून येथील चौरंगी भागात असणार्‍या आश्रमात श्रीमद् श्रीउपेन्द्रमोहनजी यांचा १४५ वा जन्म महोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त २४ ते ३१ जुलै या कालावधीत विविध विषयांवरील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now