बंगालमधील एका घरातून १२ सहस्र जिलेटीनच्या कांड्या जप्त !

पोलिसांकडून घरमालकाची ओळख उघड करण्यास नकार !

कोलकाता (बंगाल) – बिरभूम जिल्ह्यातील रामपुरहाट उपविभागातील रादीपूर या गावात असलेल्या एका घरातून १२ सहस्र जिलेटीनच्या कांड्या जप्त करण्यात आल्या. या कांड्या ६० खोक्यांमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. या घरात जिलेटीनच्या कांड्या ठेवण्यात आल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घरावर धाड घातली.

पोलिसांनी हे घर बंद (सील) केले असून घरमालकाची ओळख अद्याप उघड केलेली नाही.  या प्रकरणी पोलिसांनी स्वतःहून तक्रार प्रविष्ट करून घेतली.

जून २०२३ मध्येही पोलिसांनी बंगालमधील २४-परगणा जिल्ह्यातील भानगर येथून अशा प्रकारची स्फोटके जप्त केली होती.

संपादकीय भूमिका

सातत्याने बाँब सापडत असल्यामुळे ‘बंगाल’ आणि ‘बाँब’ आता समानार्थी शब्द झाले आहेत. बंगालमधील ममता बॅनजी सरकारला हे लज्जास्पद ! अर्थात् ममता बॅनर्जी यांची निष्क्रीयताच याला कारणीभूत आहे ! त्यामुळे केंद्र सरकारने बंगाल सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे !