ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये इमाम, मुअज्जिन आणि पुरोहित यांच्या मानधनात केली ५०० रुपयांची वाढ !

इमामांंना आता मिळणार ३ सहस्र रुपये, तर पुरोहितांना दीड सहस्र रुपये !

(इमाम म्हणजे मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणारा)
(मुअज्जिन म्हणजे मशिदीमध्ये नमाजासाठी लोकांना अजान देऊन बोलावणारा)

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी

कोलकाता (बंगाल)- बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी नोंदणीकृत इमाम, मुअज्जिन आणि पुरोहित यांना देण्यात येणार्‍या मासिक भत्त्यांमध्ये ५०० रुपयांची वाढ केली आहे. आता इमामांना प्रत्येकी ३ सहस्र रुपये, तर पुरोहितांना प्रत्येकी १ सहस्र ५०० रुपये भत्ता मिळणार आहे. तसेच मुअज्जिन यांना आता २ सहस्र ५०० रुपये मिळणार आहेत. बंगालमध्ये ३० सहस्र इमाम आणि २० सहस्र मुअज्जिन आहेत. वक्फ बोर्डच्या माध्यमांतून सरकार त्यांना भत्ता देत असते.

संपादकीय भूमिका

  • मुसलमानांना हिंदूंपेक्षा दुप्पट मानधन देऊन ममता बॅनर्जी त्यांचे सरकार धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली बहुसंख्य हिंदूंना दुय्यम स्थान देते, हेच सांगत आहे.  ममता बॅनर्जी यांच्या सरकारला निवडून देणार्‍या हिंदूंना हे मान्य आहे का ?
  • ‘धर्माच्या नावाखाली मानधन देतांना हा भेदभाव का ?’, असा प्रश्‍न निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी कधी विचारणार नाहीत, हे लक्षात घ्या !