पतियाळा (पंजाब) येथील हिंसाचाराच्या मुख्य सूत्रधाराला अटक

पंजाबच्या पतियाळा येथे खलिस्तान समर्थकांनी केलेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी मुख्य सूत्रधार बर्जिंदरसिंग बरवाना याला पंजाब पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी आतापर्यंत एकूण ९ जणांना अटक करण्यात आली आहे.

‘शिवसेना (बाळ ठाकरे)’ या संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष हरीश सिंगला यांना अटक

खलिस्तानला विरोध करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करतात; मात्र खलिस्तानचे समर्थन करणाऱ्यांवर कारवाई करत नाहीत, हे ‘पंजाबमधील आम आदमी पक्षाचे सरकार खलिस्तान समर्थक आहे’, या आरोपाला पुष्टी देते !

पंजाबमध्ये ‘शिवसेना (बाळ ठाकरे)’ या संघटनेच्या खलिस्तानविरोधी मोर्च्यावर खलिस्तान समर्थकांचे आक्रमण

पंजाबमध्ये हिंदू ‘खलिस्तान’चा विरोध करतात, तर बहुसंख्य शीख शांत रहातात, तर खलिस्तानी समर्थक हे हिंदूंचा विरोध करतात, याचा अर्थ काय घ्यायचा ?

पतियाळा (पंजाब) येथील ‘गुरु की सराय’ या शिखांच्या धार्मिक स्थळाला मशीद बनवल्याचे मत !

हिंदूंचे म्हणणे आहे की, फाळणीपूर्वी येथे शीख कुटुंब रहात होते आणि ते या स्थानाची देखभाल करत होते. त्या कुटुंबाला मुसलमानांनी धमकावून हाकलून लावले आणि ही जागा स्वतःच्या नियंत्रणात घेतली.

प्रभु श्रीरामचंद्रांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणी पंजाबमधील विद्यापिठाकडून प्राध्यापिकेला कामावरून काढले !

प्राध्यापकच हिंदूंच्या देवतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करत असतील, तर त्याचा विद्यार्थ्यांवर काय परिणाम होत असेल, याचा विचारही न केलेला बरा !

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर दारू पिऊन तख्त श्री दमदमा साहिबवर गेल्याचा आरोप

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर वैशाखीच्या (वैशाख मासाच्या प्रथम दिनी उत्तर भारतात साजरा केला जाणारा उत्सव) दिवशी दारू पिऊन तख्त श्री दमदमा साहिब येथे गेल्याचा आरोप आहे.

पंजाबला भारतापासून तोडण्यासाठी खलिस्तानवाद्यांना समवेत घेऊन शत्रूराष्ट्राचे छुपे युद्ध चालू ! – प्रवीण दीक्षित, माजी पोलीस महासंचालक, महाराष्ट्र

पंजाब सरकारने जागृत होऊन राज्य आणि सीमावर्ती भाग सुरक्षित ठेवला पाहिजे. 

पंजाबमध्ये शीख तरुणाने भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या मूर्तींवर ठेवली चप्पल !

सध्याचा शीख समाज हा ‘शीख’ हा वेगळा धर्म मानतो; मात्र वास्तवात तो हिंदु धर्माचाच एक भाग आहे. भारतात खलिस्तानवाद फोफावू लागल्यानंतर शिखांकडून हिंदूंचा दुःस्वास करणे, त्यांच्या श्रद्धास्थानांवर आघात करणे, असले प्रकार वाढू लागले आहेत.

आमदारांना एकाच कालावधीसाठी निवृत्तीवेतन दिले जाणार ! – पंजाब सरकार

एखाद्या सरकारी कर्मचार्‍याला २० वर्षे नोकरी केल्यानंतर निवृत्तीवेतन मिळते त्या तुलनेत केवळ ५ वर्षे आमदार असूनही त्यांना आजन्म निवृत्तीवेतन कसे मिळते ?

अमृतसर (पंजाब) येथे निहंग शिखांच्या वेशात आलेल्यांनी केली भगवान शिवाच्या मूर्तीची तोडफोड !

पंजाबमध्ये आता आम आदमी पक्षाचे सरकार आल्यानंतर हिंदूंवर आक्रमण होऊ लागणे, ही घटना भविष्यातील संकटाकडे लक्ष वेधत आहे. केंद्र सरकारने आतापासूनच पंजाबमधील हिंदूंच्या रक्षणासाठी प्रयत्न केले पाहिजेत !