|
पतियाळा (पंजाब) – येथे खलिस्तानच्या विरोधात काढण्यात आलेल्या ‘शिवसेना (बाळ ठाकरे)’ या संघटनेच्या मोर्च्यावर स्वतंत्र खलिस्तान देशाचे समर्थन करणाऱ्यांनी आक्रमण केल्याच्या घटनेनंतर येथे पोलिसांनी मोर्च्याचे आयोजन करणारे या संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष हरीश सिंगला यांना अटक केली. ‘पंजाबचे खलिस्तान होऊ देणार नाही’, असे सांगत सिंगला यांनी हा मोर्चा काढला होता. दुसरीकडे या संघटनेचे पंजाब प्रदेशाध्यक्ष योगराज शर्मा यांनी सिंगला यांची संघटनेतून हकालपट्टी केली आहे. संघटनाविरोधी कारवाया केल्याचा ठपका सिंगला यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या हिंसाचारानंतर श्री कालीदेवी मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. संपूर्ण परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.
Shiv Sena leader Harish Singla was arrested, in connection with the clash that broke out in Patiala today. pic.twitter.com/6UO9fcPK5D
— ANI (@ANI) April 29, 2022
संपादकीय भूमिका
खलिस्तानला विरोध करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करतात; मात्र खलिस्तानचे समर्थन करणाऱ्यांवर कारवाई करत नाहीत, हे ‘पंजाबमधील आम आदमी पक्षाचे सरकार खलिस्तान समर्थक आहे’, या आरोपाला पुष्टी देते !