पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर दारू पिऊन तख्त श्री दमदमा साहिबवर गेल्याचा आरोप

चंडीगड (पंजाब) – पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर वैशाखीच्या (वैशाख मासाच्या प्रथम दिनी उत्तर भारतात साजरा केला जाणारा उत्सव) दिवशी दारू पिऊन तख्त श्री दमदमा साहिब येथे गेल्याचा आरोप आहे. भगवंत मान यांनी मद्यधुंद अवस्थेत तख्त श्री दमदमा साहिबला भेट देणे हे शीख धर्माच्या आचारसंहितेचे उल्लंघन आहे, असे शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने म्हटले आहे. समितीने भगवंत मान यांना चूक मान्य करून शीख समुदायाची क्षमा मागण्यास सांगितले आहे.

यापूर्वी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर बादल यांनी भगवंत मान यांच्यावर शिखांच्या भावना दुखावल्याचा आरोप केला होता. भगवंत मान यांची वैद्यकीय तपासणी करण्याची मागणीही बादल यांनी केली होती.

मुख्यमंत्र्यांवरील आरोप निराधार – आप

अकाली दलाचे प्रमुख सुखबीर बादल यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर केलेले आरोप आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे प्रवक्ते मलविंदर सिंग कांग यांनी फेटाळून लावले. मुख्यमंत्र्यांवरील आरोप निराधार असल्याचे त्यांनी सांगितले.