पंजाबमध्ये ‘शिवसेना (बाळ ठाकरे)’ या संघटनेच्या खलिस्तानविरोधी मोर्च्यावर खलिस्तान समर्थकांचे आक्रमण

  • मोठ्या प्रमाणात दगडफेक 

  • तलवारीही उपसल्या ! 

  • एक हिंदु नेता आणि पोलीस अधिकारी घायाळ

पतियाळा (पंजाब) – येथे ‘शिवसेना (बाळ ठाकरे)’ या संघटनेकडून खलिस्तानच्या विरोधात ‘खलिस्तान मुर्दाबाद’ नावाने मोर्चा काढण्यात आला. त्याच्या विरोधात काही शिखांनी खलिस्तानच्या समर्थनार्थ मोर्चा काढला. शिवसेनेच्या मोर्च्यामध्ये ‘खलिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्यामुळे खलिस्तानच्या समर्थक शिखांनी तलवारी काढून मोर्च्यावर आक्रमण केले. या वेळी पोलिसांनी हवेत गोळीबार करून परिस्थिती नियंत्रणात आणली. येथे आता संचारबंदी लावण्यात आली आहे.

१. ‘शिवसेना (बाळ ठाकरे)’चे कार्यकारी अध्यक्ष हरीश सिंगला यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी  खलिस्तानवादी शिखांनी शिवसेनेला ‘माकड सेना’ म्हणून हिणावले आणि ‘मोर्च्याला विरोध करू’ असे सांगितले. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाल्यानंतर खलिस्तानवाद्यांनी शिवसेनेच्या मोर्च्यावर प्रथम दगडफेक केली आणि नंतर तलवारीद्वारे आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. त्याला शिवसैनिकांनीही प्रत्युत्तर देत दगडफेक केली आणि त्यांनीही तलवारी उपसल्या.

२. या वेळी येथील कालीमाता मंदिर परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली. या संघर्षाचे व्हिडिओ सामजिक माध्यमांतून प्रसारित झाला. एका व्हिडीओमध्ये एक व्यक्ती मंदिराच्या बाजूच्या इमारतीवर उभी राहून खाली जमलेल्या लोकांवर दगडफेक करतांना दिसत आहे. या संघर्षात एक हिंदु नेता आणि पोलीस अधिकारी घायाळ झाले. पोलिसांचे म्हणणे आहे की, दोन्ही गटांनी मोर्चा काढण्याची कोणतीही अनुमती घतिली नव्हती.

३. या प्रकरणानंतर सर्व पक्षीय नेत्यांनी दोन्ही गटांतील लोकांना शांतता बाळगण्याचे आवाहन करत आपापसांतील वाद आणि मतभेद चर्चेने सोडवण्याचे आवाहन केले आहे. सध्या येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत ! – पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान

या संघर्षावर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगितले की, याविषयी पोलीस महासंचालकांशी चर्चा झाली आहे. सध्या या परिसरात शांतता आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. राज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, यावर आमचे लक्ष आहे. पंजाबमध्ये शांतता नांदणे महत्त्वाचे आहे. (नुसतेच लक्ष ठेवणे उपयोगाचे नाही, तर खलिस्तान समर्थकांवर कारवाई करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे ! – संपादक)

आम्ही पंजाबला ‘खलिस्तान’ बनू देणार नाही ! – शिवसेना (बाळ ठाकरे)

याविषयी ‘शिवसेना (बाळ ठाकरे)’चे कार्यकारी अध्यक्ष हरीश सिंगला म्हणाले की, आम्ही पंजाबला खलिस्तान बनू देणार नाही आणि ‘खलिस्तान’ नाव उच्चारू देणार नाही. ‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी संघटनेचा संयोजक गुरपतवंत पन्नू याने २९ एप्रिल हा दिवस खलिस्तानचा ‘स्थापना दिवस’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. त्याच्या विरोधात आम्ही २९ एप्रिल या दिवशी ‘खलिस्तान मुर्दाबाद’ नावाने मोर्चा काढण्याची घोषणा केली होती.

संपादकीय भूमिका

  • पंजाबमध्ये काश्मीरप्रमाणे हिंदूंचे पलायन होण्यापूर्वी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
  •  ‘आम आदमी पक्षाचे खलिस्तानवाद्यांना समर्थन आहे’, असा आरोप होत असतांना पंजाबमध्ये ‘आप’चे सरकार आल्यानंतर खलिस्तानी समर्थक हे हिंदूंच्या मोर्च्यावर आक्रमण करण्याचे धाडस करतात, याकडे केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन तेथील हिंदूंचे रक्षण केले पाहिजे अन्यथा पंजाब दुसरे काश्मीर होईल !
  • पंजाबमध्ये हिंदू ‘खलिस्तान’ला विरोध करतात, तर बहुसंख्य शीख शांत रहातात, तसेच खलिस्तानी समर्थक हे हिंदूंना विरोध करतात, याचा अर्थ काय घ्यायचा ?