प्रभु श्रीरामचंद्रांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणी पंजाबमधील विद्यापिठाकडून प्राध्यापिकेला कामावरून काढले !

हिंदूंनी केलेल्या विरोधाची विद्यापिठाने घेतली नोंद !

(उजवीकडे) गुरसंग प्रीत कौर

पंजाब – येथील ‘लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी’ या नामांकित खासगी विद्यापिठाने गुरसंग प्रीत कौर नामक प्राध्यापिकेला नोकरीवरून काढून टाकले आहे. गुरसंग प्रीत कौर यांनी प्रभु श्रीराम यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे हिंदूंनी निषेध नोंदवल्यांनतर विद्यापिठाने वरील कारवाई केली.

१. गुरसंग प्रीत कौर यांनी श्रीराम यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलेली ध्वनीनचित्रफीत सामाजिक माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली.

. या ध्वनीचित्रफितीत ‘रावणाला चांगली व्यक्ती संबोधले असून प्रभु श्रीरामाला ‘धूर्त’ म्हटले आहे. सीतेला पळवण्यामागे प्रभु श्रीरामच असून विनाकारण रावणाला उत्तरदायी ठरवण्यात आले. असे असूनही संपूर्ण जग आज प्रभू  श्रीरामाचीच पूजा करते’, अशा प्रकारची वक्तव्ये करण्यात आली आहेत.

. या ध्वनीचित्रफितीनंतर हिंदूंनी सामाजिक माध्यमांवर गुरसंग प्रीत कौर यांच्यावर टीकेची झोड उठवली. त्याची नोंद घेऊन विद्यापिठाने त्यांना कामावरून काढून टाकले. ‘गुरसंग प्रीत कौर यांनी केलेले वक्तव्य त्यांचे वैयक्तिक मत असून विद्यापीठ त्याचे समर्थन करत नाही’, असे विद्यापिठाने म्हटले आहे.

सौजन्य : पंजाबी सनातनी हिंदु

संपादकिय भुमिका

  • धर्महानी रोखण्यासाठी तत्परतेने सामाजिक माध्यमांद्वारे निषेध नोंदवणार्‍या धर्मप्रेमी हिंदूंचे अभिनंदन !
  • प्राध्यापकच हिंदूंच्या देवतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करत असतील, तर त्याचा विद्यार्थ्यांवर काय परिणाम होत असेल, याचा विचारही न केलेला बरा !