सिंधुदुर्गातील सर्व न्यायालयांचे कामकाज आजपासून पूर्ववत् चालू होणार

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने घातलेल्या नियमांनुसार आतापर्यंत न्यायालयांचे कामकाज चालू होते. आता उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील जिल्हा मुख्यालय आणि तालुका न्यायालये १ डिसेंबरपासून सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पूर्ववत् चालू करण्यात येणार आहेत.

येत्या ४ वर्षांत राज्यातील पोलिसांसाठी १ लाख घरे बांधणार ! – अनिल देशमुख, गृहमंत्री

पोलिसांच्या घरांचा प्रश्‍न अतिशय महत्त्वाचा आहे. पुढील ४ वर्षांत राज्यातील पोलिसांसाठी १ लाख घरे बांधण्याचे नियोजन आम्ही करत आहोत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली.

सिंधुदुर्गातील कोरोनाबाधितांची स्थिती

गेल्या २४ घंट्यांत १९ नवीन रुग्ण आढळले.
आतापर्यंतचे एकूण कोरोनाबाधित रुग्ण ५ सहस्र २८५

गोव्यात पेडणे येथे ३ ठिकाणी टाकलेल्या धाडींमध्ये ३५ लाख रुपयांचे अमली पदार्थ कह्यात

गोव्यातील अमली पदार्थविरोधी पथकाने २९ नोव्हेंबरला पेडणे परिसरात वेगवेगळ्या ३ ठिकाणी टाकलेल्या धाडींमध्ये एकूण ३५ लाख रुपयांचे अमली पदार्थ कह्यात घेतले. अरंबोल, पेडणे या ठिकाणी टाकलेल्या धाडीमध्ये अमली पदार्थ बाळगल्याविषयी ३ व्यक्तींना अटक केली.

पाकसाठी हेरगिरी करणारा सैनिक प्रकाश काळे याला अटक

पाकसाठी हेरगिरी करणारा सीमा सुरक्षा दलाचा सैनिक प्रकाश काळे याला अटक करण्यात आली आहे. तो महाराष्ट्रातील नगरमधील सासेवाडी गावाचा रहिवासी आहे.

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे-करजगी यांची आत्महत्या

आत्महत्येच्या ८ घंट्यांपूर्वी सकाळी ५.४५ वाजता डॉ. शीतल यांनी ‘युद्ध आणि शांतता’ नावाचे स्वत: काढलेले चित्र ‘ट्विटर’वर ‘पोस्ट’ केले आहे.

कर्नल पुरोहित यांच्या याचिकेच्या विरोधात पीडितांना हस्तक्षेप अर्ज करण्यास मुंबई उच्च न्यायालयाकडून अनुमती

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी आरोपमुक्तीसाठी केलेल्या याचिकेच्या विरोधात हस्तक्षेप अर्ज करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने निसार अहमद बिलाल यांना अनुमती दिली आहे.

उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशांना लोकायुक्त म्हणून नेमण्याची तरतूद करावी ! – आयरिश रॉड्रिग्स

गोवा लोकायुक्त कायद्यात सुधारणा करून कोणत्याही उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशांना राज्याचे लोकायुक्त म्हणून नेमण्याची तरतूद करावी, अशी विनंती अधिवक्ता आयरिश रॉड्रिग्स यांनी गोवा शासनाकडे केली आहे.

मराठा आरक्षणाचा प्रश्‍न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला ! – छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले, खासदार, भाजप

मराठा आरक्षणाचा प्रश्‍न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला असून प्रश्‍न सोडवला नाही तर फार मोठा अनर्थ होईल, असे प्रतिपादन भाजपचे खासदार छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले यांनी केले.

(म्हणे) ‘तुमची पिढी संपेल; मात्र हैद्राबादचे नाव भाग्यनगर होणार नाही !’ – असदुद्दीन ओवैसी यांची दर्पोक्ती  

अलाहाबादचे प्रयागराज, फैजाबादचे अयोध्या होऊ शकते, तर हैद्राबादचे भाग्यनगर का होऊ शकत नाही ? हिंदु राष्ट्रात गुलामगिरीची प्रत्येक खूण नष्ट करण्यात येईल ! निजामाच्या वंशजांची दर्पोक्ती कायमस्वरूपी दडपण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !