सिंघू सीमेवर स्थानिक नागरिक आणि आंदोलनकर्ते यांच्यात संघर्ष !
तलवारी, लाठीकाठ्या आदी साहित्य घेऊन आंदोलन करणारे आणि प्रसंगी पोलिसांवर आक्रमण करणार्या आंदोलनकर्त्यांना वठणीवर आणण्याचा आदेश सरकार पोलिसांना का देत नाही ?
तलवारी, लाठीकाठ्या आदी साहित्य घेऊन आंदोलन करणारे आणि प्रसंगी पोलिसांवर आक्रमण करणार्या आंदोलनकर्त्यांना वठणीवर आणण्याचा आदेश सरकार पोलिसांना का देत नाही ?
ज्यांच्यावर समाजात घडणारे गुन्हे रोखण्याचे दायित्व असते, तेच पोलीस अधिकारी जर वेश्या व्यवसायासारख्या प्रकरणात सापडत असतील, तर अशांकडून गुन्हा रोखण्याची अपेक्षा काय करणार ?
राज्य पर्यटन खात्याने देशविदेशात पर्यटनवृद्धीसाठी ‘इव्हेंट’चे आयोजन केले. या आयोजनात गैरप्रकार केल्याच्या आरोपावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. या वेळी उपमुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांना विरोधकांनी धारेवर धरले.
मनोज परब म्हणाले, ‘‘आर्.जी.’ राजकारणात उतरत असल्याने याला अडथळा आणण्याचा हा प्रकार आहे.’’
‘आप’चे गोव्यातील एकमेव जिल्हा पंचायत सदस्य हेंजल फर्नांडिस यांनी बनावट ‘जात’ दाखला देऊन जिल्हा पंचातय निवडणूक लढवल्याची तक्रार काँग्रेसच्या नेत्या रॉयला फर्नांडिस यांनी एका याचिकेद्वारे केली आहे.
शासनाने ७ हॉटेलमालकांना आरामकरात (लक्झरी टॅक्स) नियमबाह्यरित्या १ कोटी ४५ लाख रुपये सूट दिली. ही माहिती ‘कम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया’ (कॅग) यांच्या ‘ऑडिट’ अहवालात नमूद केली आहे. ‘कॅग’ने हा ‘ऑडिट’ अहवाल २९ जानेवारी या दिवशी विधानसभेत मांडला आहे.
फोंड्याचे आमदार रवि नाईक यांनी सत्तरी, फोंडा आणि धारबांदोडा तालुक्यांचा मिळून राज्यात तिसरा जिल्हा निर्माण करण्याचा खासगी ठराव विधानसभेत मांडला होता. हा ठराव अखेर २३ विरुद्ध ८ मतांनी विधानसभेने फेटाळला.
पहिल्याच गुन्ह्याच्या वेळी कठोर कारवाई झाली असती, तर पुढील गुन्हे करण्याचे गुन्हेगाराचे असे धाडस झाले नसते.
कोमुनिदाद आणि सरकारी भूमी यांवरील बांधकामे नियमित करण्यासाठी सरकार यंत्रणा निर्माण करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा विधानसभेत दिली. हळदोणाचे आमदार ग्लेन टिकलो यांनी मांडलेल्या ठरावावरील चर्चेच्या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली.
देवराई प्रकल्प आणि सातारा पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरे वृक्ष संमेलन ऑक्टोबर मासात सातारा येथे होणार आहे, अशी माहिती अभिनेते सयाजी शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.