सातारा येथे ऑक्टोबर मासात वृक्ष संमेलन

पत्रकार परिषदेमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, देवराईचे विजय निंबाळकर, बाळासाहेब ठक्कर

सातारा, २९ जानेवारी (वार्ता.) – देवराई प्रकल्प आणि सातारा पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरे वृक्ष संमेलन ऑक्टोबर मासात सातारा येथे होणार आहे, अशी माहिती अभिनेते सयाजी शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. या वेळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, देवराईचे विजय निंबाळकर, बाळासाहेब ठक्कर आदी मान्यवर उपस्थित होते. सयाजी शिंदे पुढे म्हणाले की, पहिले वृक्ष संमेलन १३ आणि १४ एप्रिलला झाले होते. देवराईच्या वतीने गत ६ वर्षांपासून झाडे लावणे आणि जगवण्याचा उपक्रम राबवला जातो. संमेलनात वृक्षांविषयी युवकांमध्ये प्रेम निर्माण व्हावे, हा मूळ उद्देश आहे. यासाठी प्रतिवर्षी १० निसर्ग राजा आणि १० निसर्ग राणी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच १४ फेब्रुवारी या दिवशी राधानगरी येथे काटेसावर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा पोलीस दलाच्या वतीने ३० एकर जागेत ‘बायोडायव्हरसिटी’ प्रकल्प साकारला जात आहे. हा प्रकल्प ६ मासांत पूर्णत्वास जाईल.