मथुरा येथील कथावाचक सुमेधा नंदजी महाराज यांना हिंदी भाषेतील सनातन पंचांग भेट

राधा नगरातील श्री राधेश्‍वर महादेव मंदिराच्या वार्षिक महोत्सवाच्या वेळी संत समागमास उपस्थित राहिलेले वृंदावन येथील कथावाचक श्री सुमेधा नंदजी महाराज यांची सनातनचे साधक श्री. राजीव भाटिया आणि साधिका विमल धमीजा यांनी भेट घेतली.

कोडोली (तालुका पन्हाळा) परिसरात चोरून होणारी गोहत्या थांबवा !

विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचे पोलीस ठाण्यात निवेदन

कामकाज अधिक असले, तरी मंत्र्यांनी लक्षवेधीला उपस्थित रहावे ! – सभापती, विधान परिषद

जनतेचे प्रश्‍न सोडवण्याचे आश्‍वसन देेणार्‍या लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्षात त्यासाठी वेळ देणे अपेक्षित आहे !

राज्यातील ९० टक्के वाळू उत्खनन अवैध, जिल्हाधिकार्‍यांपासून मंत्रालयापर्यंत हप्ते चालू ! – प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

गेली अनेक वर्षे अवैध वाळूउपसा होत आहे. यात अनेक वेळा तहसीलदार, माहिती अधिकार कार्यकर्ते आदींवर प्राणघातक आक्रमणे झाली आहेत. अवैध वाळूउपसा चालू रहाण्यामागे भ्रष्टाचार हेच मोठे कारण आहे, हे सामान्य जनतेलाही माहीत आहे.

संभाजीनगर येथे विनामास्क फिरणार्‍यांवर कारवाई करणारे पथक आणि माजी आमदार यांच्यात हाणामारी

मास्कविना फिरणार्‍यांवर कारवाईसाठी नियुक्त करण्यात आलेले नागरी मित्र पथक आणि माजी आमदार किशनचंद तनवाणी, माजी नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी यांच्यात १ मार्च या दिवशी वाद निर्माण होऊन वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यातील एक जण पसार झालेला आहे.

लिव-इन रिलेशनशिपमध्ये सहमतीने शारीरिक संबंध ठेवल्यावर त्याला बलात्कार म्हणता येणार नाही ! – सर्वोच्च न्यायालय

पुरुष किंवा महिला विवाहाचे आश्‍वासन पाळत नसेल, तेव्हा बलात्काराचा होणारा आरोप मान्य करता येणार नाही.

गाय आणि अन्य जनवरे यांच्या हत्या रोखण्यासाठी नियमांची कार्यवाही करा ! – कोलकाता उच्च न्यायालयाचा कोलकाता महापालिकेला आदेश

असा आदेश का द्यावा लागतो ? पालिकेला तिचे दायित्व ठाऊक नाही का ?

मुलीची छेड काढण्याच्या तक्रारीवरून आरोपींकडून पित्याची गोळ्या झाडून हत्या

उत्तरप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे वाजलेले तीन तेरा !

बलात्काराच्या प्रकरणी जन्मठेपेच्या शिक्षेतील २० वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर आरोपीची निर्दोष मुक्तता

निर्दोष असूनही २० वर्षे कारागृहात रहावे लागणे, हा घोर अन्याय नव्हे का ?

तृणमूलचा विजय झाल्यास मौलाना आणि इमाम यांचे मानधन वाढवू !

तृणमूल काँग्रेसचे मंत्री फिरहाद हाकिम यांचे मशिदीमधून आश्‍वासन : हिंदु नेते कधी ‘पुरोहित, पुजारी यांना मानधन देऊ’ किंवा ‘असलेले मानधन वाढवू’, असे आश्‍वासन देत नाहीत; त्यांची मतपेढी नाही, हे लक्षात घेऊन हिंदूंनी त्यांची मतपेढी निर्माण करावी !