लिव-इन रिलेशनशिपमध्ये सहमतीने शारीरिक संबंध ठेवल्यावर त्याला बलात्कार म्हणता येणार नाही ! – सर्वोच्च न्यायालय

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाने लिव-इन रिलेशनशिपमध्ये रहाणारे जोडपे सहमती शारीरिक संबंध ठेवत असल्यास त्याला बलात्कार म्हणता येणार नाही, असे एका खटल्यावरील सुनावणीच्या वेळी स्पष्ट केले.

१. न्यायालयाने म्हटले की, अनेक कालावधीपासून दोघांमध्ये असणार्‍या नात्यातून हे संबंध असतील आणि त्यात पुरुष किंवा महिला विवाहाचे आश्‍वासन पाळत नसेल, तेव्हा बलात्काराचा होणारा आरोप मान्य करता येणार नाही.

२. कॉल सेंटरमध्ये काम करणारे एक जोडपे ५ वर्षांपासून लिव-इनमध्ये रहात होते. त्यानंतर पुरुषाने अन्य एका तरुणीशी विवाह केला. त्यावर लिव-इनमध्ये रहाणार्‍या तरुणीने विवाहाचे आश्‍वासन देऊन लैंगिक शोषण केल्याचा आरोप तरुणावर केला होता.