कुंभमेळ्यातील आखाड्यांना पायाभूत सुविधा न मिळाल्याने साधूसंतांचा संताप अनावर : अप्पर मेळा अधिकार्‍याला धक्काबुक्की

हिंदूंच्या सर्वांत मोठ्या कुंभमेळ्याला किमान पायाभूत सुविधाही उपलब्ध करू न शकणार्‍या अकार्यक्षम प्रशासकीय अधिकार्‍यांवर भाजपशासित सरकारने कडक कारवाई करावी, हीच धर्मप्रेमी हिंदूंची अपेक्षा !

पुनःश्‍च व्हावे, हिंदवी स्वराज्य ! – शिवप्रेमींनी केली हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा

छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे विजयाचा पुरस्कार करा ! – मोहन शेटे सहस्रो शिवप्रेमींच्या उपस्थितीत ‘ऑनलाईन’ शिवजयंती उत्सव पार पडला पुणे, २ एप्रिल (वार्ता.) – स्वतःचे राज्य निर्माण करण्याचा ध्यास असणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. महाराजांनी दक्षिण दिग्विजय करायला गेल्यानंतर तिरुवण्णामलई येथील मुघल आक्रमकांनी तोडलेली मंदिरे पुन्हा उभी केली. छत्रपती शिवाजी महाराज केवळ राजकीय आक्रमकांविरोधातच नव्हे, तर … Read more

(म्हणे) ‘शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी अंगणवाड्यांतून इंग्रजीचे धडे देणार !’ – महिला आणि बालकल्याण सभापती

मातृभाषेतूनच किमान प्राथमिक शिक्षण घेतल्यास मुलांचा बुद्ध्यांक वाढतो, असे शिक्षणतज्ञांनी सांगितलेले असूनही अंगणवाड्यांमधून इंग्रजी शिकवण्याची दुर्बुद्धी होणे देशासाठी दुर्दैवी आणि भावी पिढीची हानी करणारेच ठरेल !

श्रीलंकेच्या नौकेमधून ३०० किलो हेरॉईन, ५ एके-४७ रायफली जप्त

हे साहित्य इराणमधील चाबाहार बंदरावरून आले होते. हे साहित्य लक्षद्वीप येथे श्रीलंकेच्या नौकेवर ठेवण्यात आले, जे नंतर श्रीलंकेला नेण्यात येणार होते.

‘एक घाटकोपर, एक शिवज्योत’ या व्यापक संकल्पनेतून घाटकोपर (मुंबई) येथे शिवजयंती उत्साहात साजरी !

कोरोनाविषयक शासकीय नियम-अटी यांचे पालन करून हा कार्यक्रम पार पडला.

छोट्या बचत योजनांवरील व्याज दर न्यून करण्याचा निर्णय मागे

अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी १ एप्रिल या दिवशी सामाजिक माध्यमांवरून हा निर्णय मागे घेण्याची घोषणा केली आहे. आता या योजनांवर लागू असलेले व्याज दर मागील तिमाहीप्रमाणेच रहातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदान मासाच्या निमित्ताने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून रक्तदान शिबिर

हे शिबिर राजाराम तरुण मंडळ, हनुमान मंदिर, सबजेल रोड येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत होईल. शिबिरासाठी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे आशीर्वाद आहेत.

रेल्वेद्वारे कर्नाटकात जाण्यासाठी कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’ असणे बंधनकारक !

महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणार्‍या रेेल्वे गाड्यांमध्ये प्रवास करणार्‍यांनी ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी केल्याचा अहवाल जवळ बाळगणे बंधनकारक असून १ एप्रिलपासून या निर्णयाची कार्यवाही चालू करण्यात आली आहे.

सांगली महापालिकेच्या उद्यान पर्यवेक्षकास ७५ सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक

त्यांच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने आरंभलेल्या ‘ऑनलाईन’ सत्संग मालिकांच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने ‘कृतज्ञता सप्ताहा’चे आयोजन !

सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी अशा मालिका काळाची गरज असून हे सत्संग नियमितपणे पहावेत, असे आवाहन हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांनी केले आहे.