छोट्या बचत योजनांवरील व्याज दर न्यून करण्याचा निर्णय मागे

चुकून जारी झाला होता आदेश ! – अर्थमंत्री सीतारामन्

नवी देहली – छोट्या बचत योजनांवरील व्याज दर अल्प करण्याचा घेतलेला निर्णय सरकारने मागे घेतला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी १ एप्रिल या दिवशी सामाजिक माध्यमांवरून हा निर्णय मागे घेण्याची घोषणा केली आहे. आता या योजनांवर लागू असलेले व्याज दर मागील तिमाहीप्रमाणेच रहातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

३१ मार्चच्या रात्री ९ वाजण्याच्या सुमारास सरकारने छोट्या बचत योजनांचे व्याज दर कपात करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर सकाळी ८ च्या सुमारास हा निर्णय मागे घेण्यात आला.