धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदान मासाच्या निमित्ताने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून रक्तदान शिबिर

कोल्हापूर, २ एप्रिल (वार्ता.) – कोरोनाच्या काळात रक्ताचा तुटवडा लक्षात घेता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदान मासानिमित्ताने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कोल्हापूर शहरच्या वतीने ४ एप्रिलला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर राजाराम तरुण मंडळ, हनुमान मंदिर, सबजेल रोड येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत होईल. शिबिरासाठी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे आशीर्वाद आहेत.

तरी अधिकाधिक नागरिकांनी रक्तदानासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यवाह श्री. आशिष लोखंडे यांनी केले आहे.