परिस्थिती चिंताजनक असल्याने उपचार निवडीच्या पर्यायात वेळ दवडू नका ! – सौ. किशोरी पेडणेकर

या वेळी त्या म्हणाल्या, ‘‘ रेल्वेचे २ सहस्र ८०० बेड्स सिद्ध आहेत. वरळी येथे ‘एन्.आय्.सी.ए.’मध्ये खाटा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कांजूरमार्ग येथे अडीच सहस्रपर्यंत खाटा सिद्ध करत आहोत.

रेमडेसिविर इंजेक्शनच्या व्ययाला पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीने संमती नाकारली !

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनामुळे अनेक रुग्ण गंभीर स्थितीत असतांना महापालिका प्रशासनाने रेमडेसिविर इंजेक्शनची केलेली खरेदी स्थायी समितीने ‘वेटिंग’वर ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे.

पुणे शहरातील लष्करी रुग्णालयातील बेड कोरोनाबाधितांसाठी उपलब्ध करून देणार ! – प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री

तसेच ३ ते ४ दिवसांत महाराष्ट्राला १ सहस्र १०० ‘व्हेंटिलेटर’ मिळतील, लसीची जितकी आवश्यकता आहे, तितका साठा केंद्राकडून देण्याचा निर्णय झालेला आहे.

ठाण्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणारे दोघेजण अटकेत

रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा ठाणे खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून पकडला. या प्रकरणी पोलिसांनी येथील तीनहात नाका आणि बाळकुम नाका परिसरातून अतिफ अजुम अन् प्रमोद ठाकूर यांना अटक केली.

‘रेमडेसिविर’ औषधाचे मूल्य निर्धारित करा !

‘रेमडेसिविर’ या इंजेक्शनची किंमत ‘डीपीसीओ’ अंतर्गत निर्धारित करण्यात आली, तर सामान्य लोकांना इंजेक्शन सहज आणि सुलभ उपलब्ध होईल. त्यांच्यावर आर्थिक बोजाही पडणार नाही.

दळणवळण बंदीच्या दिवसांच्या निश्‍चितीअभावी आज पुन्हा ‘टास्क फोर्स’ ची बैठक !

११ एप्रिल या दिवशी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी ८ दिवसांची कडक दळणवळण बंदी असावी, असे मत मांडले, तर ‘टास्क फोर्स’ च्या सदस्यांनी दळणवळण बंदी १४ दिवसांची असावी, असे मत मांडले…..

सांगली जिल्ह्यात दळणवळण बंदी घोषित करण्यापूर्वी कोरोनाच्या पडताळणीचा अहवाल तात्काळ देणे, छोट्या घटकांना आर्थिक सहकार्य देणे यांसह अन्य गोष्टींचे नियोजन करावे ! – आमदार सुधीर गाडगीळ

पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जनभावनेचा विचार आणि कोरोनाचा प्रतिबंध यातील सुवर्णमध्य साधणारा निर्णय सरकारने घ्यावा.

सातारा जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा !

कोरोनाशी दोन हात करतांना लसीच्या तुटवड्यासमवेत आता जिल्ह्यातील रक्तपेढीलाही विविध रक्तगटांच्या रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी आता पुढे येऊन रक्तदान करण्याची आवश्यकता भासू लागली आहे.

चैत्र शुद्ध प्रतिपदेला शास्त्रानुसार गुढी उभारूनच हिंदु नववर्ष साजरे करा ! – सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

गुढीपाडवा केवळ हिंदूंचाच नाही, तर संपूर्ण विश्‍वाचा वर्षारंभ आहे. या दिवशी ब्रह्मदेवाने पृथ्वीची निर्मिती केली. शालीवाहन शकाचा आरंभदिवसही गुढीपाडवाच होय. चैत्र शुद्ध प्रतिपदा हाच खरा नववर्षारंभ आहे याला वेदांचे प्रमाण आहेत.

पार्किंग प्लाझा कोविड केंद्रामधील ऑक्सिजन संपला !

ठाणे महानगरपालिकेच्या पार्किंग प्लाझा कोविड केंद्रामधील ऑक्सिजनचा साठा संपला असल्याचे महानगरपालिकेने मान्य केले आहे.