मुंबई – राज्यात दळणवळण बंदी लागू करण्याविषयी ११ एप्रिल या दिवशी झालेल्या ‘टास्क फोर्स’च्या महत्त्वपूर्ण बैठकीत दळणवळण बंदी किती दिवसांची असावी ? याविषयी अंतिम निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे १२ एप्रिल या दिवशी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत ‘टास्क फोर्स’ची बैठक होणार आहे. यात दळणवळण बंदीच्या दिवसांचा अंतिम निर्णय होणार आहे. त्यामुळे आता या बैठकीनंतरच राज्यातील बंदीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
११ एप्रिल या दिवशी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी ८ दिवसांची कडक दळणवळण बंदी असावी, असे मत मांडले, तर ‘टास्क फोर्स’ च्या सदस्यांनी दळणवळण बंदी १४ दिवसांची असावी, असे मत मांडले. ही बैठक २ घंटे चालली.