पुणे, ११ एप्रिल – कोरोनामुळे निर्माण झालेल्या गंभीर स्थितीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली १० एप्रिल या दिवशी झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरही उपस्थित होते. त्यांनी या वेळी केंद्राकडून पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले, तसेच पुणे शहरातील लष्करी रुग्णालयातील बेड कोरोनाबाधितांसाठी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले आहे, असे अजित पवार यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलतांना सांगितले.
प्रकाश जावडेकर यांनी ससून रुग्णालयामध्ये ५०० खाटा देण्याचे नियोजन झाले असल्याचे सांगितले. तसेच ३ ते ४ दिवसांत महाराष्ट्राला १ सहस्र १०० ‘व्हेंटिलेटर’ मिळतील, लसीची जितकी आवश्यकता आहे, तितका साठा केंद्राकडून देण्याचा निर्णय झालेला असल्याचे नमूद केले, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.