मुंबई – कोरोनामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. पर्याय ठेवू नका. वेळ दवडू नका. प्रथम महापालिकेच्या ‘कोविड सेंटर’मध्ये यावे. नंतर हवे तर अन्य ठिकाणी जावे. विलंबामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे, असे वक्तव्य मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.
या वेळी त्या म्हणाल्या, ‘‘ रेल्वेचे २ सहस्र ८०० बेड्स सिद्ध आहेत. वरळी येथे ‘एन्.आय्.सी.ए.’मध्ये खाटा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कांजूरमार्ग येथे अडीच सहस्रपर्यंत खाटा सिद्ध करत आहोत. रुग्णांनी प्रभागातील ‘वॉर रूम’मध्ये नोंदणी करा. तेथे तुम्हाला खाट उपलब्ध करून देण्यात येईल. कामगार वर्ग आणि गरिबांना साहाय्य करण्याविषयी महापालिकेने सिद्धता चालू केली आहे. शालेय परीक्षा नंतरही घेता येतील, जीव महत्त्वाचा आहे.’’