राज्यातील शिशू ते ४ थी पर्यंतचे वर्ग सकाळी ७ ऐवजी ९ वाजता भरणार !

शाळांच्या वेळा पालटल्याने ‘लवकर निजे, लवकर उठे, त्यासी आरोग्य धनसंपदा लाभे’ ही शिकवण मुले कधी आचरणात आणणार ?

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या लेखाधिकार्‍याला ६ लाख रुपयांची लाच स्वीकारतांना अटक !

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाचा वित्त आणि लेखा अधिकारी सिद्धेश्‍वर शिंदे याला ६ लाख रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

रत्नागिरी जिल्ह्यात परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार होणार नाहीत, याची दक्षता घ्या !- जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह

पोलीस विभागाने विशेष सुरक्षा विशेषत: पेपर्ससंदर्भात ठेवावी. राज्य परिवहन महामंडळाने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर जाण्यासाठी अर्धा तास आधी एस्.टी. पोचेल, अशी सुविधा ठेवावी.

गणपतीपुळे येथे १० ते १६ फेब्रुवारी या कालावधीत माघी गणेशोत्सव होणार साजरा

गणपतीपुळे मंदिरात माघी गणेशोत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त मंदिर आणि मंदिर परिसरात श्रींच्या उत्सवाचे कार्यक्रम होणार आहेत.

शाळेतील हिंदु मुलींना कपाळावर टिकली, हातात बांगडी घालू देण्याविषयी अटकाव करू नये !

मुला-मुलींना कपाळावर गंध लावणे, तसेच बांगड्या घालणे यांवर कोणतेच शालेय प्रशासन बंदी आणू शकत नाही. यावर बंधने आणणे म्हणजे घटनेतील तरतुदींवर आक्षेप असण्यासमान आहे

Nikhil Wagle Complaint:निखिल वागळे यांच्या विरुद्ध सुनील देवधर यांची पुणे पोलीस ठाण्यात तक्रार !

इतरांचा अवमान करणारे विकृत वक्तव्य करायचे आणि लोकशाही पद्धतीने कुणी त्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर थयथयाट करायचा, ही वागळे यांची खोड आहे !

कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती यांचे सनातन संस्थेला आशीर्वाद !

कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती हे सोलापूर दौर्‍यावर होते. या प्रसंगी सनातन संस्थेचे साधक श्री. हिरालाल तिवारी यांनी शंकराचार्य यांचे दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

Hindu Rashtra : भारत ‘हिंदु राष्ट्र’ होणे आता निश्‍चित ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

प.पू. गोविंददेव गिरि महाराजांच्या मार्गदर्शनाखाली रामलला अयोध्येत विराजमान झाले आहेत. त्यामुळे भारत त्रेतायुगात जगत आहे. आता भारत हिंदु राष्ट्र होईल हे निश्‍चित !

४५ दिवस होऊनही मुख्य आरोपी महंत चिलोजीबुवा गुरु हमरोजीबुवा पसारच !

श्री तुळजाभवानीदेवीच्या प्राचीन मौल्यवान दागिन्यांच्या चोरीच्या प्रकरणात २० डिसेंबर २०२३ या दिवशी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

पवार गटाचे ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ हे नाव अंतिम !

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हातातून गेल्यानंतर आता शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे तीन नावांची मागणी केली होती. त्या नावांपैकी पवार गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ हे नाव केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहे.