नागपूर येथील काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांना लोकसभा निवडणूक लढवता येणार नाही !

बर्वे प्रकरणात राज्य सरकारने नव्याने त्यांच्या चौकशीचे आदेश लागू केले आहेत, तसेच गेल्या आठवड्यात जिल्हा जातपडताळणी समितीनेही बर्वे यांना नोटीस बजावली होती.

शासकीय, निमशासकीय कार्यालयात येणार्‍या अभ्यागतांना थंड पेये पिण्यासाठी उपलब्ध करून द्या ! – अमोल येडगे, जिल्हाधिकारी

जलशुष्कता प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यासाठी शालेय स्तर, तसेच शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात येणार्‍या अभ्यागतांना थंड पेये पिण्यासाठी उपलब्ध करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केल्या.

‘रेबीज फ्री पुणे’ करण्यासाठी महापालिका १ लाख ८० सहस्र प्राण्यांना लस देणार !

अभिनंदनीय निर्णय असला, तरी ‘उशिरा सुचलेले शहाणपण’, असेच म्हणावे लागेल !

नवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र सर्वाेच्च न्यायालयाने वैध ठरवले !

नवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र बोगस असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वाेच्च न्यायालयाने  रहित केला आहे.

५७ कोटी रुपयांचा कर बुडवल्याच्या प्रकरणी पुणे येथील मद्य बनवणार्‍या आस्थापनाच्या संचालकांवर गुन्हा नोंद !

सुकेतू तळेकर आणि प्रतीक चतुर्वेदी अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी राज्य कर निरीक्षक दीपक शिंदे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

भावना गवळी यांना वार्‍यावर सोडणार नाही ! – मुख्यमंत्री

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ-नांदेड मतदारसंघात हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना शिवसेनेने उमेदवारी घोषित केली. तेथे गेल्या २५ वर्षांपासून खासदार असलेल्या भावना गवळी यांना उमेदवारी नाकारण्यात आली.

धायरी (पुणे) येथे दरोड्याच्या सिद्धतेत असणार्‍या ३ अल्पवयीन मुलांना अटक !

सध्या गुन्हेगारीमध्ये अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग पहाता समाजाची वाटचाल विनाशाकडे तर होत नाही ना ? असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे मुलांना लहानपणापासून शाळेमध्ये नैतिक मूल्यांचे शिक्षण देणे आवश्यक आहे !

राज्यातील ६५ गावांचा मतदानावर बहिष्कार !

नेते आणि प्रशासन यांच्या कुचकामी धोरणांमुळे मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार घालणे, हे व्यवस्थेचे अपयशच !

पिण्याच्या पाण्यासाठी जेजुरीकरांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार !

स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मागणी करावी लागणे, हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांचे अपयश !

हिंजवडी (पुणे) येथे पुलाचे काम करतांना ‘बाँबशेल’ सापडले !

बाँबशेल पुष्कळ जुने असल्याने ते जिवंत आहे कि निकामी, हे अद्याप समजू शकलेले नाही. संरक्षण विभागाला याविषयी कळवण्यात आले आहे. संरक्षण विभागाकडून त्याची पडताळणी केल्यानंतर त्याची विल्हेवाट लावली जाईल.