कल्याण – ३ मार्च या दिवशी कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कल्याण डोंबिवली महापालिकेने संयुक्तपणे सोनारपाडा आणि माणगाव येथील अनुक्रमे जीन्स धुण्याच्या, तसेच साबण अन् ॲसिड बनवणार्या कारखान्यांसह भंगार गोदामांवर कारवाई केली आहे.
येथील औद्योगिक वसाहतीतील रासायनिक आस्थापनांकडून येणारे रसायनयुक्त निळे पाणी एका नाल्यात वहात असल्याचा प्रकार २ एप्रिल या दिवशी उघडकीस आला होता.
येथील औद्योगिक वसाहतीतील नागरिकांना प्रदूषणाचा त्रास कायमच होतो. याआधीही येथे रस्ते गुलाबी होणे, हिरवा पाऊस पडणे, तसेच नाल्यामधून निळे पाणी वहाण्याचे प्रकार घडले आहेत.
या शोधमोहिमेत कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, कल्याण-डोंबिवली महापालिकेचे ई-प्रभागाचे साहाय्यक आयुक्त आणि कामा संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
बंद पडलेल्या एका बेकरीत जीन्स धुण्याचा कारखाना चालू होता. सोनारपाडा येथील भंगाराची ८ गोदामेही या कारवाईत तोडण्यात आली. यापुढेही अवैध कारखाने, फॅक्टर्या आणि भंगाराची गोदामे यांवर कारवाई चालूच राहील, असे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी या वेळी सांगितले.
संपादकीय भूमिकाकल्याण येथे वारंवार असे प्रकार आढळत असतांना अधिकार्यांनी यापूर्वी कारवाई का केली नाही ? सामान्यांनाही प्रदूषण कशामुळे होते ते कळते, ते प्रदूषण मंडळाच्या अधिकार्यांना लक्षात येत नाही का ? |