अकोला, ४ एप्रिल (वार्ता.) – महिला आणि मुली यांना स्वसंरक्षण करता यावे अन् त्यांच्यामधे शौर्य निर्माण व्हावे, यासाठी ‘स्वराज्य नवनिर्माण फाउंडेशन’च्या वतीने स्थानिक तापडियानगर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर १ सहस्र महिला आणि मुलींसाठी लाठी-काठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर २ एप्रिल ते १२ एप्रिलपर्यंत आहे. शिबिराचे उद्घाटन ‘भरोसा सेल’च्या प्रमुख पोलीस निरीक्षक उज्ज्वल देवकर यांच्या हस्ते तथा ‘विवेकानंद इंग्लिश हायस्कूल’च्या मुख्याध्यापिका सौ. संगीता कोकीळ आणि फाउंडेशनचे रवींद्र फाटे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी शिबिराच्या अनुषंगाने मार्गदर्शनही करण्यात आले.