अहिल्यानगर येथे पतसंस्थेतील अपहारप्रकरणी ५ पदाधिकार्यांना जन्मठेप !
अहिल्यानगर जिल्हा न्यायालयाचा हा निर्णय अभिनंदनीय आहे. या प्रमाणेच कृती इतर ठिकाणी केल्यास अन्यांचेही भ्रष्टाचार करण्याचे धाडस होणार नाही.
अहिल्यानगर जिल्हा न्यायालयाचा हा निर्णय अभिनंदनीय आहे. या प्रमाणेच कृती इतर ठिकाणी केल्यास अन्यांचेही भ्रष्टाचार करण्याचे धाडस होणार नाही.
पुणे येथे घरोघरी गुढ्या उभारून आणि शोभायात्रेद्वारे नववर्षाचे नागरिकांनी उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केले. याशिवाय शहरातील छोट्या आणि मोठ्या मंदिरांत फुलांची आरास करण्यात आली होती. नागरिकांनी पाडव्यानिमित्त मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती.
विद्यार्थिनींची छळवणूक करणार्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातूनच काढून टाकायला हवे ! तसेच त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करणे आवश्यक आहे !
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत अवकाळी पावसाने सलग चौथ्या दिवशी उपस्थिती लावली आहे. भर उन्हाळ्यात सलग कोसळणारा अवेळी पाऊस आणि गारपिटी यांनी अक्षरक्ष: शेतकरी हवालदिल झाले आहेत.
अतीदक्षता विभागात उंदीर फिरतात, हे रुग्णालयाच्या आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे लक्षण !
‘जय श्रीरामा’च्या जयघोषात आणि ढोल- ताशांच्या गजरात शहरात ९ एप्रिल या दिवशी गुढीपाडव्याच्या निमित्ताने उत्साही वातावरणात शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. या वेळी उत्साही वातावरणात नववर्षाचे स्वागत करण्यात आले.
कळंबा कारागृहात भ्रमणभाष सापडल्यावरून प्रशासनावर कडक कारवाई होईल का ?
वडेट्टीवार आपल्या मुलीच्या उमेदवारीसाठी १० दिवस देहली येथे बसून होते; मात्र ते उमेदवारी मिळवू शकले नाही, असे प्रतिपादन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी पत्रकारांशी बोलतांना केले.
‘लव्ह जिहाद’च्या आरोपावरून विद्यापिठात मुसलमान विद्यार्थ्यावर आक्रमण केल्याचे प्रकरण !
अल्फान्सो, केशर, बदाम, राजापूर, मल्लिका, हिमायत, हापूस, दशरा, बेंगणपल्ली, लंगडा या जातीच्या आंब्यावर विकिरण प्रक्रिया करून त्याची निर्यात केली जाते.