माजरी (जिल्हा चंद्रपूर) येथे अन्नातून विषबाधा झाल्याने १५० नागरिक रुग्णालयात भरती !

चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी गावात अन्नातून विषबाधा झाल्याने अनुमाने १५० जणांना उपचारांसाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतील जोडपी पैसा आणि प्रसिद्धी यांसाठी विवाह करतात ! – अभिनेत्री नोरा फतेही

हिंदी चित्रपटसृष्टीतील (बॉलीवूडमधील) जी जोडपी विवाह करतात, त्यांच्यात खरे प्रेम असत नाही. ती केवळ पैसा आणि प्रसिद्धी यांसाठी विवाह करतात, असे मत अभिनेत्री नोरा फतेही यांनी एका मुलाखतीत मांडले.

राज्यभरात सध्या २ सहस्र ९३ टँकरनी पाणीपुरवठा चालू !

मराठवाडा विभागात १ सहस्र ६३, नाशिकमध्ये ४८१, पश्चिम महाराष्ट्रात ४२३, मुंबईत ८४, अमरावतीत ४० आणि नागपूर विभागात २ टँकरनी पाणीपुरवठा होत आहे.

पुणे विद्यापिठाकडून ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचा प्रयोग रहित !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्ये महात्मा फुले जयंती ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महोत्सव चालू आहे. या महोत्सवामध्ये १२ एप्रिल या दिवशी होणारा ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचा प्रयोग रहित करण्यात आला.

पुणे येथे ‘नूतन मराठी विद्यालया’तील इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांस शिक्षिकेकडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण !

असे शिक्षक विद्यार्थ्यांना कधीतरी घडवू शकतील का ? अशा शिक्षकांना बडतर्फ करून कठोर शिक्षा करायला हवी !

ट्रॅफिक सिग्नल’वर बळजोरीने पैसे मागणार्‍या तृतीय पंथियांवर पोलीस कारवाई करणार !

तृतीय पंथियांच्या रोजगाराची समस्या सोडवण्यासाठी काही ठोस उपाययोजना केल्यास त्यांचा उपद्रव न्यून होईल !

हिंदु नववर्षानिमित्त चिंचवड (पुणे) येथे भव्य शोभायात्रा उत्साहात संपन्न !

प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही गुढीपाडवा या दिवशी म्हणजेच ९ एप्रिलला नववर्षाचे स्वागत करण्यासाठी भव्य शोभायात्रेचे आयोजन ‘संस्कृती संवर्धन विकास महासंघा’च्या वतीने करण्यात आले होते.

पुणे येथे गुढीपाडव्याच्या निमित्ताने रा.स्व. संघाच्या वतीने आयोजित शोभायात्रा उत्साहात पार पडली !

पुणे येथे नागरिकांनी ठिकठिकाणी नववर्षाचे शोभायात्रेद्वारे उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केले. याशिवाय अनेक संघटना, संस्था यांनी सार्वजनिक गुढीही उभारली. याचप्रमाणे गुढीपाडव्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनेही ९ एप्रिलला शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

मालेगाव (नाशिक) येथे नमाजानंतरच्या सभेत धर्मांधाने पॅलेस्टाईनचा ध्वज फडकावला !

भारतात राहून अशा प्रकारचे देशविरोधी वर्तन करण्याचा त्यांना काहीही अधिकार नाही. ही गोष्ट त्यांना चांगली लक्षात येईल, अशा प्रकारे त्यांना दंडित करायला हवे !

हिवरे गावामध्ये (पुणे) या वर्षी झेंड्याच्या ऐवजी पारंपरिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली !

हिंदु नववर्षाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी हिंदु संस्कृतीचे जतन आणि संरक्षण करण्याच्या उद्देशाने सामूहिक गुढी उभारण्याचे आयोजन करण्यात आले होते. नववर्षाचा हा प्रारंभदिन पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला.