Deity Names Bars N WineShops : मुंबईसह उपनगरांतील ६५ टक्के बार आणि मद्यालये यांना देवतांची नावे !

बार-मद्यालये यांना अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांची नावे असती, तर उत्पादन शुल्क विभागाने असेच उत्तर दिले असते का ?

Nagpur Teacher Girl Molestation : नागपूर येथे विद्यार्थिनीशी अश्‍लील चाळे करणार्‍या शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद !

यावरून शिक्षकांची नैतिकता किती घसरली आहे, हे दिसून येते. असे वासनांध शिक्षक आदर्श विद्यार्थी काय घडवणार ? अशा शिक्षकांना बडतर्फ करून आजन्म कारावासाची शिक्षा केली पाहिजे !

BharatRatna To Yashvantrao Chavan : सत्तेत आल्यास यशवंतराव चव्हाण यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याचा प्रयत्न करू ! – राष्ट्रवादी काँग्रेस

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून २२ एप्रिल या दिवशी निवडणूक घोषणापत्र घोषित करण्यात आले !

Boycott Lok Sabha Elections 2024 : कुणकेरी (सिंधुदुर्ग) येथील सरुंदेवाडीत सर्वपक्षियांना निवडणुकीच्या प्रचारासाठी बंदी !

हे जनतेच्या विकासाच्या वल्गना करणारे राजकीय पक्ष आणि प्रशासन यांच्यासाठी लज्जास्पद ! सर्वत्रच्या जनतेने अशा प्रकारचा निर्णय घेतल्यास राजकीय पक्ष आणि प्रशासन काय करतील ?

प्रचारगीतामधून ‘जय भवानी’ उल्लेख हटवणार नाही ! – उद्धव ठाकरे  

‘जय भवानी, जय शिवाजी’ ही आमची घोषणा आहे. घोषणेतील ‘जय भवानी’ शब्द काढल्यावर भविष्यात ‘जय शिवाजी’ उल्लेख काढायला लावाल. अशी हुकूमशाही पद्धत आम्ही स्वीकारणार नाही.

१८००२२१९५० या क्रमांकावर मतदानाविषयी २४ घंटे साहाय्य !

१८ एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात या क्रमांकावर ७ सहस्र ३१२ जणांनी संपर्क करून मार्गदर्शन घेतले. यासह शंकानिरसनासाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाद्वारे (०२२) २२०२१९८७ आणि (०२२) २२०२६४४२ हे क्रमांकही उपलब्ध करून देण्यात

४७ सहस्र ३९२ कर्मचार्‍यांना प्रत्यक्ष निवडणुकीच्या कामाचा आदेश !

निवडणूक आयोगाच्या विविध २० निकषांन्वये कर्मचार्‍यांना वगळण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचार्‍यांच्या अर्जाची शहानिशा केल्यावरच त्यांचे अर्ज संमत केले आहेत.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटात ताशी ६० किमी वेगमर्यादा लागू !

गेल्या २ दिवसांपासून नवीन वेगमर्यादेची कार्यवाही चालू झाली आहे.

४० हून अधिक विद्यार्थिनींना जुलाब, पोटदुखी, उलट्या यांचा त्रास !

मुंबई विद्यापिठाच्या कलिना संकुलातील मुलींच्या नवीन वसतिगृहातील ४० हून अधिक विद्यार्थिनींना जुलाब, पोटदुखी, डोकेदुखी, उलट्या, अशक्तपणा असे त्रास होत आहेत.

मारहाण करणार्‍या धर्मांध समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी !

जिल्ह्यातील देवपूर येथे १८ एप्रिल या दिवशी श्रीरामाची गाणी वाजवली; म्हणून मुसलमानांनी भाविकांवर दगडफेक केली. ५-६ भाविकांना मारहाणही केली. या प्रकरणी देवपूर पोलिसांनी एकूण ४ जणांवर गुन्हा नोंद केला.