नागपूर : वर्गात एकटीच अभ्यास करत असलेल्या विद्यार्थिनीशी शिक्षकाने अश्लील चाळे करत तिच्याकडे शारीरिक संबंधांची मागणी केली. संबंध ठेवल्यास परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी साहाय्य करण्याचे आमीषही त्याने तिला दाखवले; मात्र विद्यार्थिनीने त्यास वारंवार नकार केला. तिने त्याला अनेकदा दूर लोटण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षकाच्या विरोधात ‘पॉक्सो’ कायद्यान्वये शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. अमोल पाटील (वय ४० वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. अमोलविरुद्ध यापूर्वीही विनयभंगाचा गुन्हा नोंद आहे.
#POCSO case registered against teacher for molesting a girl student in #Nagpur !
Such incidents portray the low morality of teachers.
How can one expect such lustful teachers to instill ideal values in students!
Such teachers should be suspended from their service and… pic.twitter.com/eFpzkELs4k
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 22, 2024
आरोपी अमोल हा कोराडीतील एका खासगी शाळेत शिक्षक असून शिकवणीवर्गही घेतो. पीडित १५ वर्षीय विद्यार्थिनी त्याच्याच वर्गात शिकते, तसेच तिने त्याच्याकडे शिकवणीही लावली आहे. १५ एप्रिल या दिवशी सकाळी ९ वाजता ती त्याच्याकडे शिकवणीसाठी गेली होती. त्या वेळी ही घटना घडली. शिक्षकाने तिला झालेल्या प्रकाराची कुणाकडेही वाच्यता न करण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने घरी परतल्यानंतर या घटनेची माहिती आईला दिली.
संपादकीय भूमिकायावरून शिक्षकांची नैतिकता किती घसरली आहे, हे दिसून येते. असे वासनांध शिक्षक आदर्श विद्यार्थी काय घडवणार ? अशा शिक्षकांना बडतर्फ करून आजन्म कारावासाची शिक्षा केली पाहिजे ! |