करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्या मुखदर्शनास आजपासून प्रारंभ!

करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवीचे मुखदर्शन उद्या, १ जानेवारीपासून  पासून भाविकांना घेता येणार आहे. त्यासाठी मंदिराचे महाद्वार उघडण्यात येणार आहे. मंदिरात सध्या सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत भाविकांना दर्शनाची सुविधा उपलब्ध आहे.

सोलापूर येथे नववर्षाच्या शुभेच्छा गुढीपाडव्याला देण्याचे आवाहन करणारा फलक !

शास्त्रीनगर भागातील धर्मप्रेमी युवकांनी पाश्‍चात्त्य परंपरा मोडीत काढून हिंदु संस्कृतीनुसार आचरण करण्याचा निर्धार केला. त्यांनी नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा हिंदु संस्कृतीनुसार गुढीपाडव्याला देण्याचे आवाहन केले.

ख्रिस्ती नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्‍वभूमीवर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी सामाजिक संस्थांकडून स्थानिक प्रशासनाला निवेदन आणि अन्य उपक्रम

हिंदु समाज धार्मिक आणि सामाजिक दृष्ट्या जागृत होत असल्याचे हे द्योतक आहे !

‘चांदा ते बांदा’ योजना बंद करून महाराष्ट्र सरकारने सिंधुदुर्गची हानी केली ! – रवींद्र चव्हाण, भाजपचे नेते

राज्य सरकारने विकासासाठी निधी दिला तर नाहीच, उलट यापूर्वी आलेला निधीसुद्धा परत घेतला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात आणलेल्या ‘चांदा ते बांदा’सारख्या महत्त्वाकांक्षी योजनेला विद्यमान सरकारने तिलांजली दिली.

कशेडी घाटात खासगी बसला अपघात : एका लहान मुलाचा मृत्यू

शिव (मुंबई) येथून कणकवलीकडे जाणारी ‘चिंतामणी’ नावाची खासगी बस पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास खेड जवळील कशेडी घाटात ५० फूट दरीमध्ये कोसळली. या बसमधून २७ प्रवासी प्रवास करत होते. यातील बहुतांश प्रवासी संगमेश्‍वर येथील आहेत.

दाभील गावात जत्रोत्सवात जुगार खेळणार्‍या ९ जणांना अटक

जत्रोत्सवात जुगार खेळणे, हा देवतेचा अवमान आहे ! हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते अशा प्रकारे धार्मिक ठिकाणी जुगारासारखे कृत्य करतात !

‘सिंधुदुर्ग लाईव्ह’ या वृत्तसंकेतस्थळाच्या वतीनेही ३१ डिसेंबरच्या रात्री रक्तदानाचा उपक्रम

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री अपप्रकार रोखण्यासाठी ‘सिंधुदुर्ग लाईव्ह’च्या वतीने ‘झिंगू नका, पिऊ नका, ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री रक्तदानाची संधी सोडू नका’, असे आवाहन करण्यात आले.

धर्माचरणाची आवड असणारी चोपडा (जिल्हा जळगाव) येथील चि. रुद्राणी पाटील (वय २ वर्षे) हिची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित !

चोपडा येथील चि. रुद्राणी पाटील (वय २ वर्षे) हिची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असल्याचे सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी या घोषित केले.

महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांची केंद्रीय औद्यागिक सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी नियुक्ती

महाविकास आघाडीचे शासन आल्यानंतर राज्यातील पोलीस भरतीप्रक्रियेवरून शासन आणि जयस्वाल यांच्यात विसंवाद निर्माण झाला होता.

रेखा जरे हत्याकांडातील पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा राष्ट्रवादीच्या आमदाराचा आरोप

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उपअधीक्षक अजित पाटील यांच्यासह त्यांच्या पोलिसांनी चांगल्याप्रकारे तपास केला आहे.’=रुणाल जरे