मुंबई – महाराष्ट्राच्या प्रस्तावित उद्योगभवनाला ‘रतन टाटा उद्योगभवन’ असे नाव देण्याचा निर्णय राज्यशासनाच्या उद्योग विभागाने घेतला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याविषयी घोषणा केली आहे, तसेच १० ऑक्टोबर या दिवशी याविषयीचा शासन आदेशही काढण्यात आला आहे. मुंबईतील चर्नी रोड येथील शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयाच्या जागेवर भविष्यात उद्योगभवनाची इमारत बांधण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे.